२०१८-०४-०४

गीतानुवाद-१०५: दीवाना मस्ताना

मूळ हिंदी गीतः मजरूह सुलतानपुरी, संगीतः एस.डी.बर्मन, गायकः आशा भोंसलेमोहम्मद फी
चित्रपटः बंबई का बाबू, सालः १९६०, भूमिकाः देव आनंद, कल्पना कार्तिक

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१८०४०४


धृ
प म गम रे गप म ग म
सां नी ध प म ग रे सा नी नी नी
दीवाना मस्तानाहुआ दिल
जाने कहाँ हो के बहार आई
प म गम रे गप म ग म
सां नी ध प म ग रे सा नी नी नी
वेडेची खुळे झाले माझे मन
जाणे कुठूनशी बहार आली

तन को छुएछुए घट काली
छेड़े लहरलहर मतवाली
बात कोई अनजाना
दीवाना मस्ताना
शरीरा माझ्या स्पर्शे रात काळी
पसरे लहर, लहर भवताली
झाले जाण खरे ते
वेडेची खुळे झाले

कुछ अनकहीकहेमेरी चितवन
बोले जियालिखे मेरी धड़कन
एक नया अफ़साना
दीवाना मस्ताना
बोल अबोलीचे, वदे माझी दृष्टी
बोले मन हे, लिहे माझे स्पंदन
एक नवीन कहाणी
वेडेची खुळे झाले

सावन लगामचल गए बादल
देखो जिसे हुआ वही पागल
कौन हुआ दीवाना
दीवाना मस्ताना
सर लागली, उसळले वारिद
पाहा जे जे, खुळे तेच झाले
कोण बरं वेडावले
वेडेची खुळे झाले


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.