२०१७-०८-१५

गीतानुवाद-०९८: इतना ना मुझसे

मूळ हिंदी गीतः राजेंद्र कृष्ण, संगीतः सलिल चौधरी, गायकः लता, तलत महमूद
चित्रपटः छाया, सालः १९६१, भूमिकाः सुनील दत्त, आशा पारेख

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१७०८१५

धृ
इतना ना मुझसे तू प्यार बढ़ा
के मैं एक बादल आवारा
कैसे किसीका सहारा बनू
के मैं खुद बेघर बेचारा
इतके न तू मजवर प्रेम करू
की मी ढग एक विहरणारा
कसा मी कुणाचा सहारा बनू
स्वतःच मी बेघर राहणारा

इसलिए तुझसे मैं प्यार करू
के तू एक बादल आवारा
जनम जनम से हूँ साथ तेरे
है नाम मेरा जल की धारा
म्हणूनच मी तुजवर प्रेम करे
की तू ढग एक विहरणारा
जन्मजन्मांतरी साथ तुझ्या
नाव माझे आहे जलधारा

मुझे एक जगह आराम नहीं
रुक जाना मेरा काम नहीं
मेरा साथ कहा तक दोगी तुम
मैं देस बिदेस का बंजारा
न एका ठिकाणी आराम मला
न थांबणे मुळी कर्तव्य मला
करशील कुठवर ग सोबत तू
मी तर देशोदेशी भटकणारा

ओ नील गगन के दीवाने
तू प्यार ना मेरा पहचाने
मैं तब तक साथ चलू तेरे
जब तक ना कहे तू मैं हारा
हे नील नभाच्या पूर्ण खुळ्या
तू प्रीत न माझी ओळखशी
तोवर सोबतच राहीन रे मी
तू म्हणशी न जोवर, हारलो मी

क्यों प्यार में तू नादान बने
एक पागल का अरमान बने
अब लौट के जाना मुश्किल है
मैने छोड़ दिया है जग सारा
का प्रेमात तू ग खुळी झालीस
एका वेड्याची का आशा झालीस
आता फिरणे परतही कठीण आहे
मी सोडले आहे जगच सारे
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.