२०१७-०६-२६

गीतानुवाद-०९६: वन्दे मातरम्

धृ
वन्दे मातरम्
बंकीमचंद्र चट्टोपाध्याय (चटर्जी)
१८७५१११७
आई तुला प्रणाम
नरेंद्र गोळे
२००६०८०९

सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्
सस्यश्यामलाम् मातरम्
शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम्
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्
सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्
सुखदाम् वरदाम् मातरम्
सुजल तू, सुफल तू, मलयानिलशीत तू
हरीतशस्यावृत्त तू
चांद्रज्योत्सनापुलकित यामिनी
उदितपुष्प-लता-वनांनी विभूषिते
सुहासिनी, सुमधूर भाषिणी
सुखदा, वरदायिनी, आई

कोटि-कोटि-कण्ठ कल-कल-निनाद-कराले
कोटि-कोटि-भुजैर्धृत-खरकरवाले
अबला केन मा एत बले
बहुबलधारिणीम् नमामि तारिणीम्
रिपुदलवारिणीम् मातरम्
वन्दे मातरम्
कोटी कोटी मुखांनी अभिव्यक्त तू
कोटी कोटी बाहूंचे बल प्राप्त तू
अबला कशी? महाशक्ती तू
अतुलबलधारिणी, प्रणितो तुज तारिणी
शत्रुदलसंहारिणी, आई
आई तुला प्रणाम

तुमि विद्या, तुमि धर्म
तुमि हृदि, तुमि मर्म
त्वं हि प्राणाः शरीरे
बाहुते तुमि मा शक्ति
हृदये तुमि मा भक्ति
तोमारइ प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे
मातरम् वन्दे मातरम्
तू विद्या, तू धर्म
तू हृदय, तू मर्म
तूच प्राण अन् कुडीही
तूच मम बाहूशक्ती
तूची अंतरीची भक्ती
तुझीच प्रतिमा वसे, हर मंदिरी, मंदिरी
आई तुला प्रणाम

त्वम् हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदलविहारिणी
वाणी विद्यादायिनी
नमामि त्वाम् नमामि कमलाम्
अमलाम् अतुलाम् सुजलाम् सुफलाम् मातरम्
वन्दे मातरम्
श्यामलाम् सरलाम् सुस्मिताम् भूषिताम्
धरणीम् भरणीम् मातरम्
तू ची दुर्गा, दशप्रहरणधारिणी
कमला, कमलदल विहारिणी
वाणी, विद्यादायिनी
तुला प्रणाम, कमले तुला प्रणाम
अमले, अतुले, सुजले, सुफले, आई
आई तुला प्रणाम
श्यामले, सरले, सुस्मिते, भूषिते
तूच घडवी, पोषी तू, आई

'आनंदमठ' लिहिण्यापूर्वी पाच वर्षे, कार्तिक शु. ९, १७ नोव्हेंबर १८७५ रोजी बंकीमचंद्र चटर्जींनी लिहिलेले हे गीत जणू 'आनंदमठ' कादंबरीसाठीच लिहिले असावे इतके चपखल बसले आहे.

संदर्भः "आनंदमठ - आक्षेप आणि खंडन", लेखक - मिलिंद प्रभाकर सबनीस, प्रकाशक - जन्मदा प्रतिष्ठान, प्रकाशन - २६ जानेवारी २००६.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.