२०१६-०७-०७

गीतानुवाद-०८३: चेहरे पे ख़ुशी छा जाती है

                        
मूळ हिंदी गीतः साहीर लुधियानवी, संगीतः रवी, गायीकाः आशा
चित्रपटः वक्त, सालः १९६५, भूमिकाः सुनीलदत्त, साधना

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६१०१४

धृ
चेहरे पे ख़ुशी छा जाती है
आँखों में सुरूर आ जाता है
जब तुम मुझे अपना कहते हो
अपने पे ग़ुरूर आ जाता है
चेहर्‍याची कळी खुलते पटकन
नेत्रांत लकाकीही येते
जेव्हा तू मला आपली म्हणसी
स्वतःचेच कौतुक वाटते

तुम हुस्न की ख़ुद एक दुनिया
हो शायद ये तुम्हें मालूम नहीं
महफ़िल में तुम्हारे आने से हर
चीज़ पे नूर आ जाता है
सौंदर्याची दुनिया तू पुरी
हे बहुधा तुला माहीत नसे
सोहळ्यात, तुझ्या आगमनाने
हर वस्तू जणू तेजे भरते

हम पास से तुमको क्या देखें
तुम जब भी मुक़ाबिल आते हो
बेताब निगाहों के आगे परदा
सा ज़रूर आ जाता है
मी पाहू कसे जवळून तुजला
येशी तू समोर जेव्हा केव्हा
होऊन अधीर, नयनांपुढती
पडदासाच येतो मात्र खरे

जब तुमसे मुहब्बत की हमने
तब जा के कहीं ये राज़ खुला
मरने का सलीका आते ही
जीने का शऊर आ जाता है
केली मी प्रीत तुझ्यावरती
तेव्हा हे रहस्य उलगडले
मरण्याच्या रीती कळून येता
जगण्याचे रहस्यही आकळते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.