२०१५-०९-२१

गीतानुवाद-०६१: जादूगर सैंया छोड़ो मोरी बैंया

मूळ हिंदी गीतः राजिंदर क्रिशन, संगीतः हेमंत, गायीकाः लता
चित्रपटः नागिन, सालः १९५४, भूमिकाः प्रदीपकुमार, वैजयंतीमाला

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८१००२

धृ
जादूगर सैंया, छोड़ो मेरी बैंया
हो गई आधी रात, अब घर जाने दो
जादूगर सजणा, सोड माझा हात ना
ढळली अर्धी रात्र, आता घरी जाऊ देजाने दे ओ रसिया, मेरे मन बसिया
गाँव मेरा बड़ी दूर है
(तेरी नगरिया रुक न सकूँ मैं
प्यार मेरा मजबूर है) \-
ज़ंजीर पड़ी मेरे हाथ
अब घर जाने दो
जाऊ दे रे रसिका, माझ्या प्रिय सखया
गाव माझे खूप दूर आहे
(तुझ्या नगरी या थांबू शके न मी
प्रेम माझे असहाय्य आहे ) \-
निर्बंधित माझे हात
आता घरी जाऊ देझुकी-झुकी अँखियाँ देखेंगी सारी सखियाँ
देंगी ताना तेरे नाम का
(ऐसे में मत रोक बेदर्दी
ले ले वचन कल शाम का) \-
कल होंगे फिर हम साथ
अब घर जाने दो
झुकते नयन हे पाहतील सखया
देतील उखाणा तुझ्या नावचा
(अशातच न तू रोख निर्दया
घे हा वायदा उद्या सांजचा)  \-
आपण भेटूच उद्याला पुन्हा
आता घरी जाऊ दे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.