२०१५-०७-३०

गीतानुवाद-०५६: रात भी है कुछ

मूळ गीतकारः साहिर लुधियानवी, संगीतः जयदेव, गायकः लता
चित्रपटः मुझे जीने दो, सालः १९६३, भूमिकाः वहिदा

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००४०११३

धृ
रात भी है कुछ भीगी भीगी
चाँद भी है कुछ मद्धम मद्धम
तुम आओ तो, आँखे खोले
सोई हुई पायल की छमछम
रात्र आहे सर्द आहे ओली
चंद्रही तळपे मध्यम मध्यम
तू येशी तर डोळे उघडेल
सुप्त पैंजणांची ही छमछम

किस को बताएं, कैसे बताएं
आज अजब है दिल का आलम
चैन भी है कुछ हल्का हल्का
दर्द भी है कुछ मद्धम मद्धम
छमछम छमछम छमछम छमछम
कुणास सांगू, कसं मी सांगू
आज अजब हृदयाची धडधड
खुशी आहे पण थोडी थोडी
खंतही आहे मध्यम मध्यम
छमछम छमछम छमछम छमछम

तपते दिल पर यूं गिरती है
तेरी नजर से प्यार की शबनम
जलते हुए जंगल पर जैसे
बरखा बरसे रुकरुक थमथम
छमछम छमछम छमछम छमछम
जळत्या हृदयी अशी पडते
तव नजरेची बिजली टकन
जळत्या वणव्या वरती जैसी
सर बरसते थांबून थांबून
छमछम छमछम छमछम छमछम

होश मे थोडी बेहोशी है
बेहोशी मे होश है कमकम
तुझको पाने की कोशिश में
दोनो जहाँ से खो गए हम
छमछम छमछम छमछम छमछम
बेभान हृदयास भान थोडे
सावध मनी बेसावध चिंतन
तुला मिळवण्याच्या प्रयासी
दोन्ही जगांना मुकले रे मी
छमछम छमछम छमछम छमछम



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.