२०१५-०५-१९

गीतानुवाद-०३८: दिल का भँवर करे पुकार

मूळ हिंदी गीतः हसरत जयपुरी, संगीतः सचिनदेव बर्मन, गायकः मोहंमद रफी
चित्रपटः तेरे घर के सामने, सालः १९६३, भूमिकाः देव आनंद, नूतन

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००४१११५


धृ
दिल का भँवर करे पुकार
प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो
प्यार का राग सुनो रे
मन चा मयुर करे पुकार
प्रेम आलाप श्रवा, प्रेम आलाप श्रवा
प्रेम आलाप श्रवा रे

फुल तुम गुलाब का
क्या जवाब आपका
जो अदा है वो बहार है
आज दिल की बेकली
गयी जुबान पर
बात ये है तुम से प्यार है
दिल तुम्ही को दिया रे
फुल तू गुलाबाचे
काय तुलना तुज असे
जी लकब तुझी बहारीची
अंतरीचे गूज ते
ओठांवरती आलेले
गोष्ट, तुजवरी प्रेम असे
हृदय तुज मी दिले गं

चाहे तुम मिटाना
पर ना तुम गिराना
आँसु की तरह निगाह से
प्यार की उँचाई
इष्क की गहराई
पुँछ लो हमारी आह से
आसमाँ छु लिया रे
वाटल्यास नष्ट कर
पण तू दवड मला
अश्रुंच्या परीच ओघळून
उंची प्रेमभावाची
खोली अनुरागाची
पूस निश्वासास माझ्या गं
आकाशा हात पोचे

इस हसीन तार पे
हम ना बैठे हार के
साया बन के साथ हम चले
आज मेरे संग तू
गुँजे दिल की आरजू
तुझ से मेरी आँख जब मिले
जाने क्या कर दिया रे
या समयी बहारीच्या
हतोत्साह आम्ही नसू
सावली बनून चाललो
आज माझे संग तू
मनीषा लागे मोहरू
तुझसी नजरभेट होत गं
काय हे केले तू गं



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.