२०१५-०५-१०

गीतानुवाद-०२९: जीत ही लेंगे बाजी

गीत: कैफी आझमी, संगीत: खैय्याम, गायक: रफी, लता
चित्रपट: शोला और शबनम, साल: १९६१, भूमिका: धर्मेंद्र

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००५०१२०




जीत ही लेंगे बाजी

जिंकू ही बाजी




धृ
जीत ही लेंगे बाजी हम तुम
खेल अधुरा छुटे ना
प्यार का बंधन, जनम का बंधन
जनम का बंधन टूटे ना
जिंकू ही बाजी मी तू
खेळ अपुरा सुटो ना
प्रेमाचे बंधन, जन्माचे बंधन
जन्माचे बंधन तुटो ना

रफी:
मिलता है जहा धरती से गगन
आओ वहीं हम जाए
तू मेरे लिये, मैं तेरे लिये
इस दुनिया को ठुकराए
दूर बसा ले दिल की जन्नत
जिसको जमाना लुटे ना
रफी:
धरतीला जिथे भेटते हे गगन
जाऊ तिथे ये आपण
तू माझ्यासाठी, मी तुझ्यासाठी
ह्या संसारा सोडू आपण
दूर मनीचा वसवू स्वर्ग
ज्याला जग हे लुटो ना

लता:
मिलने की खुशी,
ना मिलने का गम
खत्म ये झगडे हो जाए
तू तू ना रहे मैं मैं ना रहूँ
इक दूजे में खो जाए
मैं भी ना छोडूँ पल भर दामन
तू भी पल भर रुठे ना
लता:
भेटण्याची खुशी,
विरहाचाही सल
बंद हे सारे होत जावोत
राहू तू तू नको, मी मी राहते
अद्वैती ये राहू आपण
मीही सोडू पळ ही साथ
तू ही रुसशी क्षणभर ना



https://www.youtube.com/watch?v=06hu0QJ_UO8

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.