२०१३-०७-०६

गीतानुवाद-०२२: यूँ हसरतों के दाग

गीतकार: राजेंद्र कृष्ण, संगीत: मदनमोहन गायीका: लता
चित्रपट: अदालत, साल: १९५८, भूमिका: नर्गिस

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००५०१०४


यूँ हसरतों के दाग
जरी अतृप्तीचे शल्य



धृ
यूँ हसरतों के दाग,
मोहब्बत में धो लिये,
मोहब्बत में धो लिये
खुद दिल से दिल की बात कहीं
और रो लिये
जरी अतृप्तीचे शल्य
मी, प्रीतीत भुलवले,
मी, प्रीतीत भुलवले
स्वत: मी, कथून गूज,
रडुनी घेतले



घर से चले थे हम तो,
खुशी की तलाश में,
खुशी की तलाश में
गम राह में खडे थे
वही साथ हो लिये
घर सोडुनी निघाले,
फिरुन सौख्य शोधण्या,
फिरुन सौख्य शोधण्या
होते पथी जे दु:
तेच, साथ जाहले



यूँ मुरझा चुका है फिर भी,
ये दिल फूल ही तो है,
ये दिल फूल ही तो है
अब आप की खुशी,
इसे काटों में तोलिये
कोमेजले जरी हे हृदय,
फूल ची गमे,
फूल ची गमे
मर्जी तुझी, तू
त्यास काट्यांत जोडले



यूँ होटों को सी चुके तो,
जमाने ने ये कहा,
जमाने ने ये कहा
ये चुप सी क्यों लगी है,
अजी कुछ तो बोलिये
शिवले मी जरी ओठ
तर, जग हे बोलले,
तर जग हे बोलले
अशी चुप्प का तू, बोल,
बोललेच पाहिजेस



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.