२०१२-०४-२५

पाऊली यांचे वर्जनतत्त्व


पाऊली यांचे वर्जनतत्त्व
(अर्थात पाऊलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल)

त्या काळी एन्रिको फर्मी, वुल्फगँग पाऊली ह्या ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञाच्या, अलीकडील एका संशोधनाबाबत विचार करत होते. पाऊली एकेकाळी मॅक्स बॉर्न ह्यांचे सहकारी होते. केंद्रकाभोवती फिरणाऱ्या आण्विक विजकांच्या हालचालींचा अभ्यास करत असतांना, पाऊलींनी असे निरीक्षण केलेले होते की, एका कक्षेत केवळ एकच विजक असतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, कुठलेही दोन विजक एकाच कक्षेचा अवलंब करत नाहीत.

फर्मींना हे समजले की, ही घटना प्रत्येक अणूत, याआधी लक्षात न आलेली आणखी एखादी व्यवस्था अस्तित्वात असल्याचे सूचित करत आहे. वायूतील अणू हे घनातील अणूच्या मानाने अभ्यासास जास्त सोपे असतात, म्हणून त्यांनी वायूतील अणू आणि त्यांतील कणांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले. फार फार पूर्वी त्यांनी "परिपूर्ण" वायूची कल्पना केलेली होती. खरेखुरे वायू अनिश्चित स्वरूपाच्या बाह्य बलांनी बाधित होतात. त्याउलट "परिपूर्ण" वायू स्थिरपद राहत असावेत अशी त्यांची कल्पना होती. अशाप्रकारचा "परिपूर्ण" वायू, अणू आणि विजकांच्या वर्तनांचा अभ्यास करण्यासाठी आदर्श पर्यावरण ठरू शकतो. प्रारणांनी उत्सर्जित ऊर्जेचे त्यात निरीक्षण करता येते आणि ती मोजताही येते. पण अशा वायूचे नियमन कुठल्या नियमांनी होत असावे? त्या नियमांत आणि पाऊलींच्या संशोधनात काय संबंध असावा?

गप्पा मारत मारत, फर्मी आणि त्यांचे मित्र फ्रँको रासेट्टी एव्हाना डबक्यापाशी पोहोचलेले होते. त्यांनी त्यांचे सोबत दोन लांब दांडे आणलेले होते. प्रत्येकाच्या टोकाशी रेशमी दोरीचा सरफास बांधलेला होता आणि त्याच्या टोकाशी मासेमार लोक बांधतात तशा पद्धतीने लहान सहान किटकांचे आमिषही बांधलेले होते. ते डबक्याच्या कडेला भुकेल्या सरड्यांनी आमिषांवर झडप घालण्याची वाट पाहत बसून राहिले.

"सरडा अगदी समोरच आहे," रासेट्टी कुजबुजले. "ईशान्येकडे सरकत आहे. वेग शून्य दशांश एक सात नॉटस्."

फर्मींनी तेवढ्यात असे काही पाहिले होते, ज्याकडे रासेट्टींचे लक्षच गेलेले नव्हते. दुसरा एक लहान सरडा, त्याच आमिषाकडे समांतरपणे सरकत होता. त्यांनी एकाच वेळी झेप घेतली. मोठ्या सरड्याने आमिष पकडले. रासेट्टींनी दोऱ्याला झटका दिला, फास आवळला आणि मोठा सरडा गिरफ्तार झाला. मात्र झेपावणारा लहान सरडा थोडा कमी पडला. आणि मागे वळून पळून गेला.

हो! खरेच आहे!! कुठलेही दोन विजक एकाच कक्षेत राहू शकत नाहीत. कारण कुठल्याही दोन विजकांची पुंज स्थिती सारखीच नसते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, ते एकाच आकाराचे नसतात. किंवा त्यांचे तापमान सारखेच नसते, किंवा त्यांची विद्युत अवस्था सारखीच नसते, अथवा ह्या तीन्ही गोष्टी असतात. हेच काही मुद्दे विजकांची कक्षा ठरवत असतात.

फर्मींचे मन धावत होते. आधीच ते त्या "परिपूर्ण" वायूच्या संदर्भात विचार करत होते, जो त्यांनी एकल अणूचा मानला होता. त्याच्या अणूतील विजक कसे वागत असावेत. मग फायरेंझमध्ये परतल्यावर पुन्हा, त्यांनी लगेचच "परिपूर्ण एकल वायूच्या पुंजीकरणाबाबत" नावाचा शोधनिबंध लिहायला घेतला.

त्या शोधनिबंधात काढलेले निष्कर्ष आजही धातुवैज्ञानिक आणि अभियंते अनुसरत आहेत. इतर गोष्टींसोबतच, त्यात विविध धातू किती चांगल्या वा वाईट प्रकारे उष्मा वा विद्युत वहन करतात ते निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत. फर्मींचे निष्कर्ष वैध होते आणि आजही आहेत. एवढेच नव्हे तर आणखीही एका शास्त्रज्ञांनी -पॉल डिरॅक ह्यांनी- स्वतंत्रपणे तेच आकडे शोधून काढले होते. ह्याच सूत्रांना अजूनही "फर्मी-डिरॅक संख्यांकने -Fermi-Dirac Statistics-" म्हणून ओळखले जाते आणि त्यांच्या नियमांचे अनुसरण करणाऱ्या वायूकणांना "फर्मिओन्स" म्हटले जाते.

हा लेख, “एन्रिको फर्मी: अणुयुगाचा प्रणेता [१] ह्या पुस्तकातील एका उतार्‍याचा मराठी अनुवाद आहे.
पूर्वप्रसिद्धीः मनोगत डॉट कॉम ०६-०२-२००८


[१]  एन्रिको फर्मी: अणुयुगाचा प्रणेता (Enrico Fermi: Pioneer of Atomic Age), मूळ इंग्रजी लेखक: टेड गॉटफ्रीड, मालिका: आधुनिक युगाचे कर्ते (Makers of the Modern Age), प्रकाशक: युनिव्हर्सिटी प्रेस, प्रकाशन काल: १९९९,  वितरक: ओरिएंट लाँगमन लिमिटेड, किंमत: रु.१२५/- फक्त.

२०१२-०४-२१

गीतानुवाद-००८: पायल वाली देखना


मूळ हिंदी गीतः मजरूह, संगीतः चित्रगुप्त, गायकः किशोर
चित्रपटः एक राज़, सालः १९६३, भूमिकाः किशोर, जमुना

नरेंद्र गोळे २००८०५१६


पायल वाली देखना
पैंजणवाले जप जरा




लचकत चमकत चलत कामिनी
दधिगुन दमकत चपल दामिनी
ओ बाँवरी ओ साँवरी, अरी ओ चंचल
पल-छिन रुक जा, रुक जा रुक जा
लचकत मुरडत चाले कामिनी
दिपवत चमकत चपळ दामिनी
वो बावळी ओ सावळी अगं ए चंचल
क्षणभर थांब ना थांब ना थांब ना

धृ
पायल वाली देखना, यहीं पे कहीं दिल है,
पग तले आये ना
पैंजणवाले जप जरा, इथेच कुठे मन आहे,
पायतळी येवो ना

जैसे दामनिया बदरा में उड़े
कुछ दूर चले फिर जा के मुड़े
उठा रे नयन कजरारे
पर इतना समझ ले किसी की लगे हाये न
जशी दामिनी ती, मेघांतून उडे
थोडी चाले पुढे, हलकेच वळे
उचल ए, नयन तव काळे
पण एवढे समज की, कुणाची लागो हाय ना

कित झूम चली मदिरा सी पिये
मतवारी पवन अचरा में लिये
ज़माना है यूँ ही मस्ताना
देखो जी कहीं ऋत बिना काली घटा छाये न
कुठे जाशी अशी मदिराशी पिऊन
मदमस्त पवन पदरात भरून
आहे सारे जगच मस्तीभरे
पाहा पण कधी, ऋतुआधी, रात काळी, येवो ना

कहीं ऐसा न हो कोई बात बने
अँगड़ाई मेरी तेरा नाच बने
नाचो री न बन के चकोरी
घूँघर कहीं धड़कन मेरी बन जाये न
कधी ऐसे न हो, काही गोष्ट घडे
फिरकी ही माझी, तुझा नाच बने
नाच ना, ना बनून चकोरी
घुंगरू कधी, स्पंदन माझे, होवोत ना


२०१२-०४-१६

गीतानुवाद-००७: याद न जाए

मूळ गीतकार: शैलेन्द्र, संगीत: शंकर-जयकिसन, गायक: महंमद रफी -सुमन कल्याणपूर
चित्रपट: दिल एक मंदिर है, साल: १९६३, भूमिका: राजेंद्र कुमार , मीनाकुमारी

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००४०१०७



याद जाए
सय नाही जात



धृ
याद जाए, बीते दिनों की
जाके आए जो दिन,
दिल क्यूँ बुलाए, उन्हे
सय नाही जात, गेल्या दिसांची
येती जाऊन जे दिस,
मन का पुकारे, त्यांस



दिन जो पखेरू होते,
पिंजरे मे मै रख देता
पालता उनको जतन से,
मोती के दाने देता
सीने से रहता लगाए
दिस पाखरू जर असते,
पकडून मी ठेविता
पाळता त्यांना खुशीने,
मोत्यांचे दाणे देता
छातीशी जपता धरून



तस्वीर उनकी छुपा के,
रख दूँ जहां जी चाहे
मन मे बसी ये सुरत,
लेकिन मिटे मिटाए
कहने को है वो पराए
प्रतिमा तयांची जरी का,
लपवता नजरेसमोरून
हृदयी उमटली मूर्ती,
परंतु हटे हटवून
परकेच म्हटले जरी ते


२०१२-०४-१३

शास्त्रज्ञ-०१: होमी जहांगीर भाभा




आज, ३० ऑक्टोंबर रोजी, होर्मसजी जहांगीर भाभा यांचा जन्मदिवस आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर यांसारख्या भारतातील अग्रगण्य संशोधन संस्थांचे ते संस्थापक होते. त्या संस्थांमध्ये आजही हा दिवस ’फाऊंडर्स डे’ म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. भाभांना भारतीय अणुऊर्जेचे जनक मानले जाते. मात्र भारताच्या विकासात त्यांनी बजावलेली कळीची भूमिका बहुतेकांस काहीशी अपरिचितच असते.

त्यांच्या जन्मदिवसाचे निमित्ताने भारताच्या ह्या थोर सुपुत्राची सम्यक ओळख करून द्यावी म्हणून हा लेख प्रकाशित करत आहे. होमी जहांगीर भाभा या दुव्यावरील डॉ.सुबोध महन्ती यांच्या मूळ इंग्रजी लेखाचा हा शब्दशः केलेला मराठी अनुवाद आहे.

होमी जहांगीर भाभा(जन्मः ३० ऑक्टोंबर १९०९, मुंबई, मृत्यूः २४ जानेवारी १९६६, माऊंट ब्लांक)

"मला आयुष्याकडून काय हवे आहे, हे मला अतिशय स्पष्टपणे माहीत आहे. केवळ आयुष्य आणि माझ्या भावना या दोघांबाबत मी सावध आहे. माझे आयुष्यातील सावधपणावर प्रेम आहे आणि मला तो जेवढा मिळू शकेल तेवढा हवाच आहे. मात्र आयुष्यकाळ मर्यादित असतो. म्रुत्यूनंतर काय, हे कुणालाही माहीत नसते. मला त्याची फिकिरही नाही. अर्थातच, मी आयुष्यकाळ वाढवून त्यातील आशय वाढवू शकत नाही. मात्र, मी आयुष्याची प्रखरता वाढवून त्याचा आशय वाढवेन. कला, संगीत, काव्य आणि इतरही सर्व बाबतीतल्या माझ्या सावधानतेचा उद्देश, आयुष्यातील सावधानतेची प्रखरता वाढवणे हाच असतो." -होमी जहांगीर भाभा.

होमी जहांगीर भाभा हे बहुधा भारतीय आण्विक कार्यक्रमाचे प्रमुख शिल्पकार म्हणून ओळखले जातात. मात्र, भारताच्या विकासातील त्यांची भूमिका अणुऊर्जेच्या क्षेत्राबाहेरही दूरवर पसरलेली आहे. त्यांनी दोन महान संशोधन संस्था स्थापन केल्या. त्या म्हणजे 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ आणि 'ऍटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट ट्रॉम्बे' जिचे भाभांच्या मृत्यूनंतर 'भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर' असे पुनर्नामांकन करण्यात आले होते. भारतात विजकविद्या विकसित करण्यात त्यांनी कळीची भूमिका बजावलेली होती. भाभा उत्कृष्ट वैज्ञानिक आणि कुशाग्र अभियंते होते. धन-विजकांच्या विजकांमुळे होणार्‍या विखुरणांच्या संभाव्यतेकरता त्यांनी सुयोग्य अभिव्यक्ती शोधून काढली होती. अशा विखुरण्यास नंतर भाभा-विखुरणे (भाभा-स्कॅटरिंग) असे नाव पडले. १९३७ साली प्रकाशित झालेल्या, डब्ल्यू.हिटलर यांच्या सोबत त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या अभिजात शोधनिबंधात अवकाशातील प्राथमिक विश्वकिरणे, वरच्या वातावरणाशी कशा प्रकारे परस्पर कार्यरत होतात ह्याचे वर्णन केलेले आहे. जमिनीच्या पातळीवरील निरीक्षणांत आढळून येणारे कण, ह्या प्रक्रियेत निर्माण होत असतात. भाभा आणि हिटलर यांनी, गॅमा किरणे आणि धन व ऋण विजक-जोड्यांच्या उतरत्या धबधब्यांमुळे विश्वकिरणवर्षाव कसा निर्माण होतो त्याचे स्पष्टीकरण दिलेले होते. १९३८ मध्ये भाभा यांनीच प्रथमतः असा निष्कर्ष काढला होता की, अशा कणांच्या गुणधर्मांची निरीक्षणे आपल्याला अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या सापेक्षता सिद्धांताच्या थेट प्रायोगिक प्रत्ययाप्रत नेतील.

भाभांजवळ संवेदनाक्षम आणि संस्कारित अशी सर्वोच्च दर्जाच्या कलेची देणगी होती. ज्या परिस्थितीत ते वाढले त्या परिस्थितीने हे उत्तम गुण विकसित करण्यात त्यांना नक्कीच मदत केली. त्यांना संगीत आणि नृत्य आवडे. त्यांना भारतीय आणि पाश्चात्य अशा दोन्हीही संगीतांची लक्षणीय जाण होती. ते चित्रे आणि रेखाटने काढत असत. ते नाट्य नेपथ्यांचे अभिकल्पनही करत असत. ते काही सामान्य दर्जाचे वास्तू-शिल्पकार नव्हते. भाभा परिपूर्णतेचे चाहते होते. ते खरेखुरे वृक्षप्रेमी प्रेमी होते. त्यांच्या संरक्षणार्थ जे जे त्यांना करणे शक्य असेल, ते ते सर्व, ते करत असत. लॉर्ड रेडक्लिफ-माऊड भाभांच्या व्यक्तिमत्त्वाच्या निरनिराळ्या पैलूंचे यथार्थ वर्णन करतांना म्हणतात, "आपलेसे वाटणारे आणि संवेदनाक्षम, भारदस्त आणि विनोदी, गतीमान आणि स्थितप्रज्ञ. मी ओळखत असलेल्या फार थोड्या लोकांपैकी भाभा एक होते (दुसरे मायनार्ड केन्स होते), जे कुठल्याही संदर्भात, जगण्याला उच्च पातळीप्रत घेऊन जात असत. होमी कमालीचे बुद्धिमान, पण दर्जाबाबत एवढे चोखंदळ होते की त्यामुळे ते कधीही निष्काळजी ठरत नसत. जे काम ते करायचे ठरवत असत ते, ते प्रेमाने काम करणारा व्यावसायिक म्हणून करत. ते अविरतपणे सृजनशील होते. जीवनाच्या सर्व स्वरूपांवर ते प्रेम करत असल्यामुळे जीवनाची संपन्नता वाढवत असत. वैज्ञानिक सर्वोत्कृष्टता कलेच्या सर्वोत्तम कौशल्यासोबतही नांदू शकते आणि वंशभेद मैत्रीकरता अडथळा ठरू शकत नाही, ह्याचे ते जीते-जागते प्रतीक ठरले. जेव्हा भारतीय कलेचे अलीकडचे अखेरचे प्रदर्शन लंडनमध्ये भरले होते, तेव्हा बर्लिंगटन हाऊससमोर फलकावर लावण्याकरता जे चित्र निवडले गेले होते ते भाभांच्या चित्रांमधलेच एक होते. त्यांना चित्रांइतकेच संगीतही आवडे. पहिला एडिंबर्ग उत्सव सुरू झाला तेव्हा भारतातून विमानाने येण्याची योजकता त्यांनी दाखवली होती आणि अलीकडच्या बिथोवन क्वार्टेटचा विषय निघाला तेव्हा त्यांना ती संगीतरचना माहीत होती. एका परिषदे पाठोपाठ झालेल्या युनेस्कोच्या दुसर्‍या परिषदेत, भारतीय प्रतिनिधी मंडळातील इतर विख्यात सदस्यांमध्ये ते; शिक्षण, विज्ञान आणि संस्कृती ह्या तिन्ही विषयांत गुणवत्ताप्राप्त जागतिक नागरिकाच्या स्वरूपात उठून दिसू लागले. परिषदेचा इतर कुठलाही भारतीय सदस्य क्वचितच तसा उठून दिसत होता. वस्तुतः त्यांना वाटते तर, ते संघटनेचे नेतृत्व करण्याकरता स्वयंसिद्ध पर्याय ठरले असते. यावरूनच त्यांचे जाणे भारतीय विज्ञान आणि संस्कृतीस किती शोकजनक ठरले याची जाणत्यांना कल्पना करता येते".

होमी जहांगीर भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोंबर १९०९ रोजी मुंबईतील एका सधन पारशी कुटुंबात झाला होता. विद्यार्जन आणि शैक्षणिक क्षेत्रातील सेवेची, भाभांच्या कुटुंबात दीर्घ परंपरा होती. त्यांचे आजोबा -ज्यांचे नावही होमी जहांगीर भाभाच होते- म्हैसूर संस्थानातील सर-शिक्षण-निरीक्षक होते. भाभांचे वडील जहांगीर होर्मसजी भाभा यांचे शिक्षण ऑक्सफर्ड येथे झालेले होते. पुढे ते वकील झाले. त्यांची आई मेहेरन, सर दिनशॉ माणेकजी पेटीट यांची नात होती. मुंबईत सर दिनशॉ यांना, त्यांच्या लोककल्याणकारी गुणांखातर मान मिळत असे. भाभा यांच्या आत्याचा, जमशेटजी नुसरवानजी टाटा (१८३९ - १९०४) यांचे जेष्ठ सुपुत्र सर दोराबजी ज. टाटा (१८५९ - १९३२) यांचेशी विवाह झालेला होता.

भाभा यांनी मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल्स या शाळांत शिक्षण घेतले. वयाच्या १५ व्या वर्षी सिनियर केंब्रिज एक्झामिनेशन उत्तीर्ण होताच त्यांनी प्रथम मुंबईतील एलिफिंन्स्टन कॉलेजमध्ये, आणि नंतर मुंबईतीलच रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रवेश घेतला. १९२७ मध्ये भाभा केंब्रिजमधील गॉनव्हिले आणि कैअस कॉलेजमध्ये रुजू झाले. ह्याच कॉलेजात त्यांचे काका सर दोराबजी ज. टाटा यांनीही शिक्षण घेतलेले होते. पुढे त्यांनी ह्याच कॉलेजला १९२० मध्ये पंचवीस हजार पौंडांची देणगीही दिलेली होती. भाभा यांनी १९३० ची मेकॅनिकल सायन्सेस ट्रायपॉस परीक्षा दिली. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की, भाभा यांचे वडील तसेच काका सर दोराबजी ज. टाटा या दोघांनाही भाभा हे इंजिनियर व्हावेत असे वाटत असे, ज्यामुळे अंतिमतः ते जमशेटपूरमधील टाटा आयर्न अँड स्टील या कंपनीत रुजू होऊ शकले असते. केंब्रिजमध्ये असतांना भाभा यांचे स्वारस्य हळूहळू सैद्धांतिक भौतिकशास्त्राकडे वळत होते. १९२८ मध्ये वडलांना लिहिलेल्या पत्रात भाभा लिहितात, "मी अतिशय गांभिर्याने तुम्हाला हे सांगतो आहे की व्यवसाय करणे अथवा इंजिनियर म्हणून नोकरी करणे हे माझ्याकरता नाही. हे माझ्या स्वभावास पूर्णतः परके आणि माझ्या मतांत व वृत्तीत न बसणारे आहे. भौतिकशास्त्र ही माझी दिशा आहे. मला माहीत आहे की इथे मी काहीतरी महान असे करू शकेन. प्रत्येक माणूस केवळ त्याच एका विषयात सर्वोत्तम कर्तबगारी दाखवू शकतो, सर्वोत्तम ठरू शकतो, ज्याचे त्याला वेड असते, ज्यावर त्याचा अतूट विश्वास असतो जसा माझाही आहे, आणि जे साध्य करण्याचे सामर्थ्य त्याचेपाशी असते. वस्तुतः त्याचा जन्मच ते करण्यासाठी झालेला असतो तो ते साध्य करेलच असे विधिलिखित असते. तसाच भौतिकशास्त्राचा अभ्यास करावा ह्या इच्छेने मी प्रेरित झालेलो आहे. कधीतरी मला ते करायचेच आहे आणि मी ते नक्कीच करेन. माझे केवळ हेच एक ध्येय आहे. एखाद्या मोठ्या पेढीचा प्रमुख व्हावे किंवा ’यशस्वी’ माणूस व्हावे अशी आकांक्षा मला नाही. ज्यांना ते आवडते असे बुद्धिमान लोक अनेक आहेत, त्यांना ते करू द्यावे. विज्ञानाचा धिक्कार करायचीही ज्यांना फिकीर नव्हती त्या, बिथोव्हन ह्यांना ’तुम्ही वैज्ञानिक व्हा, ते फार महान काम असते.’ असे सांगून काय उपयोग. तसेच ’अभियंते व्हा, ते बुद्धिवंतांचे काम असते’ असे सॉक्रेटिस यांना सांगून काय उपयोग. त्यांच्या ते स्वभावातच नाही. म्हणून मी तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे सुचवतो की मला भौतिकशास्त्र अभ्यासू द्या.”

भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी ते गणित-ट्रायपॉस करू चाहत होते. भाभांच्या वडलांना त्यांच्या अतूट निर्धारामुळे सौम्य व्हावे लागले. तरीही त्यांनी एक अट घातली. त्यांनी होमीस सांगितले की, त्याने जर मेकॅनिकल-ट्रायपॉस यशस्वीरीत्या साध्य केली तर, ते त्याला केंब्रिज येथे राहू देतील आणि गणित-ट्रायपॉस करू देतील. म्हणून जेव्हा भाभा यांनी मेकॅनिकल-ट्रायपॉस प्रथम वर्गात उत्तीर्ण केली तेव्हा त्यांचे वडलांनी त्यांना त्यांची इच्छा पूर्ण करू दिली. अशाप्रकारे दोन वर्षांनंतर भाभांनी गणित-ट्रायपॉसही प्रथम वर्गात उत्तीर्ण केली. भाभा यांना पॉल ऍड्रिअन डिरॅक (१९०२-८४) हे शिकवत असत. ते केंब्रिजमधील लुकाशिअन प्रोफेसर ऑफ मॅथेमॅटिक्स होते (१९३२-६९) आणि त्यांना पुंज-सिद्धांतावरील त्यांचे कामाखातर, १९३३ सालचे भौतिकशास्त्रातले नोबेल पारितोषिक, इर्विन श्रॉडिंजर (१८८७-१९६१) यांचे सोबतीने देण्यात आलेले होते. मग भाभा कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत रुजू झाले, जिथून त्यांनी सैद्धांतिक भौतिकशास्त्रात पी.एच.डी. पदवी प्राप्त केली. १९३२ ते १९३४ दरम्यान त्यांना गणितातील राऊज बॉल ट्रॅव्हलिंग स्कॉलरशिप मिळत होती. याशिवाय १९३१-१९३२ दरम्यान त्यांना सॅलोमन्स-स्टुडंटशिप-इन-इंजिनिअरिंगही मिळत असे. त्यांनी युरोपात प्रवास करून, वुल्फगाँग पाऊली (१९००-५८) यांचेसोबत झुरिचमध्ये आणि एन्रिको फर्मी (१९०१-५४) यांचेसोबत रोममध्ये काम केले. त्यांचा पहिला शोधनिबंध १९३३ साली प्रकाशित झाला. त्यामुळे त्यांना १९३४ मध्ये आयझॅक न्युटन स्टुडंटशिप मिळाली. ती त्यांना पुढे तीन वर्षेपर्यंत मिळत होती. त्यादरम्यान ते बहुधा केंब्रिजमध्येच काम करत होते. थोडासा काळ कोपेनहेगन येथे त्यांनी नील्स हेन्रिक डेव्हिड बोहर (१८८५-१९६२) यांचेसोबत काम केले त्याचाच काय तो अपवाद. जेव्हा भाभा कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत काम करत होते त्यादरम्यानच अनेक खळबळजनक शोध लागले. १९३२ मध्ये जेम्स चॅडविक (१८९१-१९७४) ह्यांनी विरक्तकाचे अस्तित्व दाखवून दिले, जॉन डग्लस कॉक्राफ्ट (१८९७-१९६७) आणि अर्नेस्ट थॉमस सिंटन वॉल्टन (१९०३-९५) यांनी उच्च-गती प्रकाशकण धडकवून, परस्पर-स्वभावांतरण किंवा हलक्या मूलद्रव्यांचे विघटन कृत्रिमरीत्या घडवून आणले; आणि पॅट्रिक मायनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट्ट (१८९७-१९७४) आणि गिऊस्पे पावलो स्टॅनिस्लाओ ऑच्चिआलिनी (१९०७-) मेघ-कक्ष प्रकाशचित्रांद्वारे गॅमा-प्रारणांद्वारे घडून येणार्‍या मूलक-जोड्या आणि वर्षाव (शॉवर) निर्मिती दाखवून दिली.

केंब्रिजमध्ये भाभा यांचे काम मुख्यतः विश्वकिरणां भोवतीच होत राहिले. इथे ह्याची दखल घ्यावी लागेल की एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस, बाह्य अवकाशातून येणार्‍या भेदक (पेनेट्रेटिंग) प्रारणांचे अस्तित्व, चार्लस थॉमसन रीस विल्सन (१८६९-१९५९) यांनी केलेल्या विद्युत-दर्शक-यंत्रांसहितच्या साध्या प्रयोगांतून संवेदले गेले. रॉबर्ट अँड्र्यूज मिलिकन (१८६८-१९६३) या अमेरिकन, नोबेल विजेत्या भौतिकशास्त्रज्ञाने, अतिशय ऊर्जस्वल भारित कणांच्या ह्या प्रारणांना ’विश्वकिरण’ हे नाव दिले. त्यात निरनिराळ्या प्रकारची अणुकेंद्रके असतात, मात्र मुख्यत्वे धनक असतात. प्राथमिक विश्वकिरण वातावरणाशी परस्पर-कार्यरत होऊन दुय्यम किरणे निर्माण करतात पूर्वीच उल्लेख केल्यानुसार भाभा यांनी डब्ल्यू.हिटलर यांच्या सहयोगाने १९३७ साली प्रकाशित एका शोधनिबंधात विश्वकिरण वर्षावाच्या निर्मितीचे स्पष्टीकरण दिले. त्याआधी विश्वकिरण वर्षावाच्या निर्मितीकरता जबाबदार असलेल्या घडामोडींबाबत (मेकॅनिझम) खूप निरनिराळे अंदाज बांधले जात असत. केंब्रिज येथे काम करत असतांना भाभा यांनी केलेले महत्त्वाचे योगदान, जी.वेंकटरामन ह्यांनी, त्यांच्या युनिव्हर्सिटी प्रेस हैद्राबादद्वारा १९९४ मध्ये प्रकाशित झालेल्या, ’भाभा अँड हिज मॅग्निफिकंट ऑब्सेशन’, या पुस्तकात, पुढीलप्रमाणे सांगितलेले आहे. सापेक्ष-विनिमय-विखुरणाचे (रिलेटिव्हिस्टिक-एक्सचेंज-स्कॅटरिंग अथवा भाभा विखुरणाचे) स्पष्टीकरणः

१. विश्वकिरणांतील विजक आणि धन-विजक वर्षावांची निर्मिती (भाभा-हिटलर सिद्धांत).
२. युकावा-कणाचे अनुमान, ज्याला त्यांनी ’मेसॉन’ हे नाव सुचवले.
३. मेसॉन र्‍हासात सापेक्ष-काळ-विस्तार (रिलेटिव्हिस्टिक-टाईम-डायलेशन) प्रभावांचे भाकीत.

१९५० सालचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणार्‍या सेसिल फ्रँक पॉवेल (१९०३-१९६९) यांनी भाभा यांच्या संशोधनकार्याचे महत्त्व लिहून ठेवले आहे. ते म्हणतात, विद्युत‌चुंबकीय परिभाषेत, विश्वकिरणवर्षाव कसे विकसित होतात याबाबतचे आपले आकलन घडवण्यात भाभा यांचा निर्णायक वाटा आहे. त्याकाळी गट-सिद्धांत-पद्धतीनेच केवळ ज्यांचे अस्तित्त्व ज्ञात होते, अशा प्राथमिक कणांबाबतचे स्पष्टीकरण देण्याच्या भाभा यांच्या प्रयत्नांबद्दलही ते त्याकाळी विख्यात होते. गेल आणि इतरांनी पुढे सारख्याच उद्दिष्टांकरता वापरलेल्या पद्धती वापरणार्‍यांत, ते अग्रणी होते. माझे मित्र लिओपोल्ड इन्फेल्ड म्हणतात की, भाभा हे एक प्रतिष्ठित (डिस्टिंग्विश्ड) आणि भारदस्त (एलेगंट) तत्त्वज्ञ होते आणि त्यांचे शोधनिबंध नेहमीच उत्तम अभिरुचीने लिहिलेले असत. प्राथमिक कणांच्या एका वर्गाकरताच वापरले जाणारे ’मेसॉन’ हे नाव भाभा यांनीच सुचवलेले होते. जेव्हा कार्ल डेव्हिड अँडरसन (१९०५-९१) यांनी, विश्वकिरणांत आढळून येणारा आणि विजक व धनक यांचेदरम्यानचे वस्तुमान असणारा एक नवा कण शोधून काढला होता, तेव्हा त्यांनी त्याला ’मेसॉटॉन’ असे नाव दिले होते. पुढे, बहुधा मिलिकन यांच्या सल्ल्यावरून, त्यांनी ते ’मेसॉट्रॉन’ असे बदलवले. भाभा यांनी ’नेचर’ ला पाठवलेल्या एका छोट्याशा नोंदीत (फेब्रुवारी १९३९), त्याकरता ’मेसॉन’ हे नाव सुचवले. ते लिहितात, "अँडरसन आणि नेड्डरमेयर यांनी, विश्व प्रारणांत विजक आणि धनक यांदरम्यानचे वस्तुमान असणारा जो एक नवा कण आढळून आलेला आहे, त्यास ’मेसॉट्रॉन’ हे नाव सुचवलेले आहे. असे वाटते की त्या शब्दातील ट्र अनावश्यक आहे. कारण मुळातील ग्रीक शब्द ’मेसो’ म्हणजे मधला ह्यात ट्र नाही. न्युट्रॉन आणि एलेक्ट्रॉन ह्यांच्यातील ट्र, अर्थातच त्यांच्या मूळ शब्दांतील म्हणजे ’न्युट्र’ आणि ’इलेक्ट्र’ ह्यांच्यातून आलेला आहे. ..... त्यामुळे तार्किक दृष्ट्या आणि लहान होत असल्यामुळेही नव्या कणास ’मेसॉट्रॉन’ ऐवजी ’मेसॉन’ असेच म्हणावे. अँडरसन यांचा कण (म्यु-मेसॉन), प्रथमतः हिडेकी युकावा (१९०७-८१) यांनी भाकीत केलेला आणि सशक्त आण्विक बल धारण करणारा व अणुगर्भास एकत्र बांधून ठेवणारा कण मानला जाई. मात्र, नंतर जेव्हा त्याची अणुगर्भकांसोबतची परस्परक्रिया खूपच तुरळक असल्याचे आढळून आले. त्यामुळे युकावा यांनी सुचवलेल्याप्रमाणे त्याची ’एकत्र बांधून ठेवणारा कण’ अशी भूमिका असण्याबाबत शंका उपस्थित झाली. १९४७ मध्ये सी.एफ.पॉवेल यांनी जेव्हा वैश्विक प्रारणांतील, विजकाच्या २६४ पट वस्तुमान असणारा एक कण (पाय-मेसॉन किंवा पायॉन) पुन्हा शोधून काढला तेव्हा हा पेच सुटला. पायॉन अणुगर्भकांसोबत खूप जोरदारपणे परस्पर कार्यरत होई आणि अगदी नेमकेपणे युकावांनी भाकीत केलेल्या भूमिकेत बसे. म्यु-मेसॉन किंवा म्युऑन हा पाय-मेसॉनची र्‍हास-निष्पत्ती होता.

१९३९ मध्ये जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले, त्यावेळी भाभा भारतात होते. एका छोट्याशा सुट्टीवर ते आलेले होते. मात्र, युद्धामुळे त्यांची योजना बदलली. इंग्लंडमधील बहुतेक शास्त्रज्ञांना युद्धकालीन कामांत भाग घ्यावा लागला आणि त्यामुळे मूलभूत संशोधनास वाव राहिला नव्हता. म्हणून, केंब्रिज येथील संशोधनाचे काम करण्याकरता पुन्हा इंग्लंडला परतण्याची त्यांची योजना भाभांना सोडून द्यावी लागली. इथे हे लक्षात घ्यावे लागेल की प्रशांतचंद्र महालनोबिस (१८९३-१९७२) यांनी फिजिक्स ट्रायपॉस उत्तीर्ण केल्यावर, कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत, मेघ-कक्षाचे शोधकर्ते सी.टी.आर.विल्सन यांचेसोबत काम करण्याची व्यवस्था केलेली होती. मग ते थोड्याशा सुट्टीकरता भारतात परतले होते. त्यानंतर पहिले महायुद्ध सुरू झाल्यामुळे मग तेही परत जाऊ शकले नव्हते. १९४० मध्ये भाभा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर मध्ये सैद्धांतिक भौतिकशास्त्राचे प्रपाठक (रिडर) म्हणून रुजू झाले. हे पद त्यांचेकरताच विशेषरूपाने निर्माण केले गेले होते. तिथे चंद्रशेखर व्यंकट रमण (१८८८-१९७०) हे संचालक होते. १९४४ मध्ये भाभा यांना प्राध्यापक करून घेण्यात आले. भाभा तिथे असतांना विक्रम साराभाई (१९१९-७१) यांनी सुद्धा काही काळ तिथे व्यतित केलेला होता. तिथे भाभा यांनी विश्वकिरणांवरील संशोधनाचे मार्गदर्शन केले. त्यांनी तिथे, विश्वकिरणांवरील संशोधनाच्या प्रायोगिक आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्रविषयक पैलूंवर संशोधन करणारा तरूण संशोधकांचा एक गटच संघटित केला होता. भारतात काही वर्षे घालवल्यावर मग इंग्लंडला परतण्यात भाभांना स्वारस्य राहिले नाही. बहुधा मातृभूमीप्रतीच्या जबाबदारीची वाढती जाणीव होऊ लागल्यामुळे हे घडले असेल. सावकाशपणे त्यांची अशी खात्री पटली की आघाडीच्या वैज्ञानिक ज्ञानावर संशोधन करणारे गट उभे करणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. २० एप्रिल १९४४ रोजी त्यांनी सुब्रमण्यम्‌ चंद्रशेखर (१९१०-९५) यांना लिहिलेल्या पत्रात असे लिहिले की, ... पुरेसा सन्मान आणि आर्थिक पाठबळ मिळत असेल तर, देशातच राहून, इतर सुदैवी देशांत असलेल्या शैक्षणिक संस्थांच्या तुलबळ संस्था, देशातच उभ्या करणे हे एखाद्याचे कर्तव्यच ठरायला हवे, ह्या दृष्टीकोनाप्रत मी पोहोचलो आहे.

१९४० च्या सुरूवातीस भाभा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर मध्ये काम करत होते. त्यावेळी. आण्विक भौतिकशास्त्र, विश्वकिरणे, उच्च ऊर्जा भौतिकशास्त्र आणि भौतिकशास्त्रातील इतर आघाडीच्या ज्ञानशाखांवर मौलिक काम करण्याकरता आवश्यक असणार्‍या सोयी उपलब्ध असलेली एकही संस्था देशात अस्तित्वात नव्हती. म्हणून, त्यांनी मार्च १९४४ मध्ये सर दोराबजी जे. टाटा ट्रस्टला, मूलभूत भौतिकशास्त्रात झपाट्याने काम करणारी एक संशोधन संस्था निर्माण करण्याकरता, एक प्रस्ताव दिला. त्यात त्यांनी लिहिले की, भारतात आजमितीस सैद्धांतिक आणि प्रायोगिक अशा दोन्हीही भौतिकशास्त्रातील मूलभूत समस्यांवर काम करणारी एकही मोठी संशोधन संस्था अस्तित्वात नाही. मात्र सक्षम माणसे भारतभर विखुरलेली आहेत. एका जागी राहून, योग्य त्या दिशेने प्रेरित केल्यास करू शकतील असे काम मात्र, ती माणसे आज करत नाही आहेत. म्हणून हे भारताचे निखळ हिताचे आहे की, भारतात मूलभूत भौतिकशास्त्रात झपाट्याने काम करणारी एक संशोधन संस्था असावी. कारण अशी संस्था भौतिकशास्त्राच्या केवळ अप्रगत शाखांतच संशोधनाचे नेतृत्व करेल असे नसून, उद्योगांतील निकडीच्या व्यावहारिक उपायोजनांच्या समस्यांतही संशोधनाचे नेतृत्व करेल. जर भारतात आज होत असलेले बहुतांशी उपायोजित संशोधन हे असमाधानकारक असले किंवा निकृष्ट दर्जाचे असले, तरी ते पूर्णतः, पुरेशा संख्येत मूलभूत संशोधक अस्तित्वात नसण्यामुळे घडते आहे. असे संशोधक चांगल्या संशोधनाचे मानदंड तयार करतील आणि संचालक मंडळांवर सल्लागार म्हणून काम करतील. याशिवाय, आजपासून आणखी सुमारे वीस वर्षांनी, जेव्हा आण्विक ऊर्जा वीजनिर्मितीकरता यशस्वीरीत्या उपायोजित झालेली असेल, तेव्हा भारतास तज्ञांकरता इतरत्र शोध घ्यावा लागणार नाही, तर ते हाताशी उपलब्ध असतील. मला असे वाटत नाही की, इतर देशांतील विज्ञानाच्या विकासाशी परिचित असलेली कुठलीही व्यक्ती, मी प्रस्तुत करत आहे तशा संस्थेची भारतास गरज असल्याचे नाकारेल. ज्या विषयांवर संशोधन आणि प्रगत शिक्षण व्हावयाचे आहे ते असतील, सैद्धांतिक भौतिकशास्त्र -विशेषतः मूलभूत समस्यांवर-, विश्वकिरणे, आण्विक भौतिकशास्त्र आणि विश्वकिरणांवरील प्रायोगिक संशोधन. आण्विक भौतिकशास्त्र विश्वकिरणांपासून निराळे करणे शक्यही नाही आणि वांच्छनीयही नाही, कारण सैद्धांतिकदृष्ट्या दोन्हीही निकट संबंधित आहेत.

सर दोराबजी जे. टाटा ट्रस्टच्या ट्रस्टींनी भाभांचा प्रस्ताव आणि तशी संस्था सुरू करण्याची आर्थिक जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय एप्रिल १९४४ मध्ये घेतला. मुंबई (त्यावेळची बॉम्बे) ही जागा प्रस्तावित संस्थेकरता निवडण्यात आली कारण त्यावेळच्या गव्हर्न्मेंट ऑफ बॉम्बे ने संयुक्तरीत्या संस्थेच्या स्थापनेकरता स्वारस्य दाखवले होते. अशाप्रकारे टाटा इंस्टिट्य़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे उद्‌घाटन १९४५ मध्ये एका अस्तित्वात असलेल्या इमारतीतील भाड्याने घेतलेल्या ५४० वर्ग मीटर जागेत करण्यात आले. १९४८ मध्ये रॉयल यॉच क्लबच्या जुन्या इमारतींत ही संस्था हलवण्यात आली. संस्थेच्या हल्लीच्या इमारतीचे उद्‌घाटन पंडित जवाहरलाल नेहरू यांचे हस्ते जानेवारी १९६२ मध्ये झाले. त्याआधी नेहरूंनीच संस्थेचा पाया १९५४ मध्ये घातलेला होता. १९६२ मध्ये ह्या इमारतीचे उद्‌घाटन करतांना नेहरू म्हणाले होते की, सामान्यतः ह्यासारखी इमारत बांधून पूर्ण होण्यास आठ वर्षांचा विलंब लागावा हे जरा जास्तच वाटते. मात्र मध्ये एकदा आलो तेव्हा आणि आत्ता ह्या इमारतीस अंशतः भेट दिल्यावर, यावर टीका करण्याची माझी मूळ भावना काहीशी बदलली, कारण ज्या प्रकारे ते साध्य करण्यात आलेले आहे त्याकरता प्रचंड प्रमाणात प्रयास केला गेलेला दिसत आहे. अडचणी आलेल्या आहेत, तरीही जे साध्य झालेले आहे ते खूपच मूल्यवान आहे. ह्या संस्थेस दुसर्‍या वर्षापासून, वैज्ञानिक-आणि-औद्योगिक-संशोधन-परिषद आणि नैसर्गिक-व-वैज्ञानिक-संशोधन-विभाग यांचेद्वारा भारत सरकारचे आर्थिक पाठबळ लाभले. आज संस्थेस प्रमुख आर्थिक पाठबळ अणुऊर्जाविभागाद्वारे भारत सरकारच देत आहे. इथे हे अधोरेखित करायला हवे आहे की टाटा इंस्टिट्य़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या भावी विकासाकरता कुठलाही संघटनात्मक आराखडा बनवला गेलेला नव्हता. भाभा यांनी प्रथम योग्य ती माणसे निवडली आणि मग त्यांना विकासाची संधी दिली गेली. याच प्रकारचे तत्त्व कैसर विल्हेल्म समाजाने, जर्मनीत मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटची इमारत बांधतांना अवलंबले होते. कैसर विल्हेल्म समाज, प्रथम संशोधन संस्था उभारणार आणि मग त्याकरता योग्य अशी माणसे हुडकणार, असे करणार नाही. तर प्रथम असामान्य माणूस हुडकेल आणि मग त्याचेकरता संस्था उभी करेल. यासंदर्भात भाभांनी भारतीय राष्ट्रीय विज्ञान संस्थे (जिलाच पुढे भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी असे नाव दिले गेले) च्या वार्षिक सभेत भाषण करतांना ऑक्टोंबर १९६३ मध्ये पुढील निरीक्षणे नोंदवली होती. ते म्हणाले, मला असे वाटते की, सरकारी हुकूमाने वैज्ञानिक संस्था निर्माण होऊ शकतात यावर भारतात आपण विश्वास ठेवू शकतो. वैज्ञानिक संस्था, मग ती प्रयोगशाळा असो वा अकादमी, ती एखाद्या वृक्षाप्रमाणेच खूप काळजीपूर्वक वाढवावी लागते. दर्जा आणि साध्ये यांबाबत तिची वाढ केवळ खूप मर्यादित प्रमाणातच त्वरित करता येते. हे असे क्षेत्र आहे ज्यात खूप मोठ्या संख्येतील मध्यम अथवा दुय्यम दर्जाचे कार्यकर्ते, असामान्य माणसांची उणीव भरून काढू शकत नाहीत आणि काही असामान्य माणसे विकसित होण्याकरता १०-१२ वर्षे सहज घेऊ शकतात.

आपल्या राष्ट्रीय प्रयोगशाळांपैकी खूपच प्रयोगशाळा ज्या क्षेत्रांत त्यांनी काम करावयाचे आहे ते क्षेत्र निश्चित करून, मग विदेशातील काही संबंधित मोठ्या प्रयोगशाळांचा तर्जुमा समोर ठेवून, त्यांचा संघटनात्मक तक्ता तयार करून, निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यात मग असे आपसूकच गृहित धरण्यात आलेले आहे की, त्या तक्त्यानुसार आवश्यक ती पदे जाहिराती देऊन भरली जाऊ शकतात. योग्य त्या उच्च दर्जाचे कार्यकर्ते भारतात उपलब्धच नाहीत किंवा कुठल्यातरी दुसर्‍या संस्थेतूनच मिळवावी लागतील व तसे केल्यास त्या संस्था कमजोर होतील, ह्या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केले जाते. आपली विद्यापीठे नेहमीच कमजोर राहत आलेली आहेत. ह्याबाबतीत ती आणखीनच कमजोर झालेली आहेत.

अणुऊर्जेतील संशोधन संघटित करण्यातील पहिली पायरी होती बोर्ड ऑफ रिसर्च इन ऍटोमिक एनर्जीची निर्मिती. ते बोर्ड, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचा एक भाग होते आणि भाभा त्याचे अध्यक्ष होते. सरकारचा एक संपूर्ण विभाग, अशा स्वरूपात डिपार्टमेंट ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचा प्रस्ताव करतांना, शांतिस्वरूप भटनागर (१८८४-१९५५) यांनी असा प्रस्ताव केलेला होता की बोर्ड ऑफ रिसर्च इन ऍटोमिक एनर्जीला ह्या नव्या विभागात हलवण्यात यावे. मात्र भाभांच्या स्वतःच्या अशा कल्पना होत्या. त्यांना असे वाटे की अणुऊर्जा-कार्यक्रमास ह्या नव्या विभागातून बाहेर ठेवावे. २६ एप्रिल १९४८ रोजी भाभा यांनी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान असलेल्या जवाहरलाल नेहरू यांना, भारतातील अणुसंशोधनाचे संघटन या शीर्षकाचे एक टिपण पाठवले. त्यात भाभा यांनी असे लिहिले की, अणुऊर्जेचा विकास एका खूप लहान आणि उच्चाधिकार प्राप्त यंत्रणेवर सोपवावा, जिच्यात असे म्हणू या की तीन कार्यकारी अधिकार असलेल्या व्यक्ती असतील ज्यांचे उत्तरदायित्व कुठल्याही मध्यस्थ दुव्याखेरीज थेट नेहरूंप्रती असेल. थोडक्यात ह्या यंत्रणेस ’अणू-ऊर्जा-आयोग’ असेही संबोधले जाऊ शकेल. भाभांनी ह्या गोष्टीवर भर दिला की ’अणू-ऊर्जा-आयोगा’चे स्वतःचे असे सचिवालय असावे. मंत्रिमंडळाच्या अथवा सरकारच्या इतर कुठल्याही विभागाच्या सचिवालयापासून, अगदी प्रस्तावित डिपार्टमेंट ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चच्या सचिवालयापासूनही स्वतंत्र. त्यांनी असेही सुचवले की, एकदा का ’अणू-ऊर्जा-आयोग’ नियुक्त झाले की मग अस्तित्वात असलेल्या बोर्ड ऑफ रिसर्च इन ऍटोमिक एनर्जीचे विसर्जन करावे. काही महिन्यांतच सरकारने भाभा यांचा प्रस्ताव स्वीकारला आणि इंडियन ऍटोमिक एनर्जी ऍक्ट-१९४८ अस्तित्वात आल्यानंतर ऑगस्ट १९४८ मध्ये ’अणू-ऊर्जा-आयोग’ निर्माण झाले. त्याचा कार्यभाग खालीलप्रमाणे होता.

१. वेळोवेळी, आवश्यकतेनुरूप, देशाच्या अणुऊर्जेसंदर्भातील स्वारस्याची अभिव्यक्ती ठरतील अशा पायर्‍यांनी, भारत सरकारला इंडियन ऍटोमिक एनर्जी ऍक्ट-१९४८ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारावर अंमलबजावणी करणे.
२. भारतीय अधिपत्याखालील प्रदेशांचे सर्वेक्षण करून अणुऊर्जेसंबंधित उपयुक्त खनिजांची जागा निश्चित करणे, आणि अस्तित्वात असलेल्या संस्था व विद्यापीठे यांतून अशा प्रकारच्या संशोधनास उत्तेजन आणि अनुदान देणे.
३. भारतीय विद्यापीठांत आण्विक भौतिकशास्त्रातील प्रशिक्षण आणि संशोधन सुविधा वाढवण्याकरता विशेष पावले उचलली जातील.

पहिल्या अणू-ऊर्जा-आयोगात भाभा अध्यक्ष होते. त्यांचे खेरीज इतर दोन सदस्य होते शांतिस्वरूप भटनागर आणि करिआमनिक्कम श्रीनिवास कृष्णन्‌ (१९९८-१९६१). भारताचा आण्विक कार्यक्रम भक्कम पायावर उभा करण्याकरता भाभांना आवश्यक वाटणार्‍या तीन गोष्टी पुढीलप्रमाणे होत्या.

१. नैसर्गिक संसाधनांचे, विशेषतः अणुऊर्जा कार्यक्रमाचे स्वारस्य असलेल्या, युरेनियम, थोरियम, बेरेलियम, ग्रॅफाईट इत्यादी पदार्थांचे सर्वेक्षण करणे. हे साध्य करण्याकरता एक विशेष एकक रेअर मिनरल्स डिव्हिजन या नावाने, दिल्लीत, दाराशॉ नौशेरवान वाडिया (१८८३-१९६९) यांचे मदतीने, स्थापन करण्यात आले.
२. मूलभूत विज्ञानातील, विशेषतः भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांतील, सशक्त संशोधन संस्थांचा, त्यांना सुविधा आणि उच्च-दर्जाचे-संशोधक-शास्त्रज्ञ पुरवून विकास घडवून आणणे.
३. उपकरणनाच्या, विशेषतः विजकविद्येतील उपकरणनाच्या कार्यक्रमाचा विकास घडवून आणणे. विजकविद्या-उत्पादने-एकक या नावाचे एक एकक टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये निर्माण करण्यात आले. हेच एकक पुढे, भारतीय-विजकविद्या-परिषद-मर्यादित, हैदराबाद या नावाने प्रसिद्ध झालेल्या एका मोठ्या परिषदेचे बीज झाले.

जेव्हा भाभा यांना असे लक्षात आले की, अणुऊर्जा कार्यक्रमाकरताचा तंत्रविकास इतःपर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये सुरू ठेवणे शक्य राहणार नाही, तेव्हा त्यांनी असा निर्णय घेतला की केवळ या उद्दिष्टाकरताच वाहिलेली एक नवी प्रयोगशाळा उभारली जावी. त्यांनी याकरता मुंबईनजीक, ट्रॉम्बेजवळ १,२०० एकर जमीन मिळवली. अशाप्रकारे ऍटोमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट १९५४ पासून सुरू झाली. याच वर्षी अणुऊर्जाविभागही सुरू झालेला होता.

१९४१ मध्ये भाभा यांची रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली. १९४३ मध्ये त्यांना केंब्रिज विद्यापीठाने त्यांच्या विश्वकिरणांवरील कामाखातर ऍडम्स प्राईझ दिले आणि १९४८ मध्ये केंब्रिज फिलॉसॉफिकल सोसायटीचे हॉपकिन्स प्राईझही दिले. १९६३ मध्ये त्यांची यु.एस.अकॅडमी ऑफ सायन्सेसचे फॉरेन असोसिएट म्हणून, तसेच न्यूयॉर्क अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सन्माननीय आजीव सदस्य म्हणूनही निवड झाली. १९६४ मध्ये ते रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सेस, माद्रिद चे फॉरेन करस्पाँडिंग अकॅडमीशियन नेमले गेले. १९६० पासून ते १९६४ पर्यंत ते इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाईड फिजिक्सचे प्रेसिडेंट होते. संयुक्त राष्ट्रांच्या विद्यमाने ऑगस्ट १९५५ मध्ये जिनिव्हा येथे झालेल्या ऐतिहासिक अणुऊर्जेच्या शांतीपूर्ण उपयोगांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे ते अध्यक्ष होते. १९६३ साली ते भारतातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसचे अध्यक्ष होते. याशिवाय ते, १९५१ मध्ये इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचे अध्यक्ष होते. भारत सरकारने १९५४ साली त्यांना पद्‍मभूषण हा किताब दिला.

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा अडतीच्या वैज्ञानिक सल्लागार समितीच्या सभेस हजर राहण्याकरता व्हिएन्ना येथे जात असता, आल्पस्‌ पर्वताच्या विख्यात माऊंट ब्लांक शिखरानजीक झालेल्या विमान अपघातात, २४ जानेवारी १९६६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे संचालक आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते, भारत सरकारचे अणुऊर्जाविभागातील सचिव होते, अणुऊर्जा आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष होते आणि ऍटोमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट ट्रॉम्बेचे संचालकही होते. भाभा यांच्या आयुष्याचा वेध घेणार्‍या, बहुधा रूपरेषात्मक आणि सुघटित नसलेल्या ह्या लेखाचा समारोप भाभांबद्दल जे.आर.डी.टाटा यांनी काढलेल्या पुढील उद्‍गारांनी करणेच लेखकास आवडेल. ते उद्‌गार असे आहेतः

"वैज्ञानिक, अभियंता, सिद्धहस्त निर्माता आणि प्रशासक, तसेच मानवी कलाकौशल्यांत व संगीतात उत्तुंग उंची गाठलेले होमी, हे एक खरेखुरे परिपूर्ण पुरूष होते".

[१] विजेचा कण म्हणजे ’विजक’. त्या विजकाचे शास्त्र म्हणजे विजकविद्या. इंग्रजीत इलेक्ट्रॉनिक्स.
[२] धन विद्युतभार असलेला, विजकाइतक्याच वस्तुमानाचा कण. धन-विजक. इंग्रजीत पॉझिट्रॉन.
[३] वॉल्टर हेन्रिच हिटलर (२ जानेवारी १९०४ ते १५ नोव्हेंबर १९८१) हे भाभा यांचे गुरू व मार्गदर्शक होते.
[४] पदार्थास विरक्तच ठेवणारे जे अण्वंतर्गत कण असतात ते ’विरक्तक’. इंग्रजीत न्यूट्रॉन.
[५] प्रकाशाचा कण म्हणजे प्रकाशकण. इंग्रजीत फोटॉन.
[६] एका मूलद्रव्यापासून दुसरे मूलद्रव्य निर्माण होण्यची प्रक्रिया. इंग्रजीत म्युटेशन.
[७] इंग्रजीत क्लाऊड-चेंबर.
[८] पदार्थास धन किंवा ऋण करणार्‍या अण्वंतर्गत कणांस अनुक्रमे ’धनक’ (प्रोटॉन) किंवा ’ऋणक’ (इलेक्ट्रॉन) म्हणतात. उदासिन अणुतून एक विजक किंवा ऋणक निघून गेल्यावर, उरतो उर्वरित वस्तुमानाचा धनभारित अणू. हा पदार्थाचा मूल कण, या नात्याने ’मूलक’ (आयॉन) म्हणून ओळखला जातो. विजकासही याच अर्थाने मूलक मानता येते. धनक व विजक मिळून विरक्तक तयार होतो. म्हणून विरक्तकास मात्र पदार्थाचा मूलक किंवा मूल कण म्हणता येत नाही. मात्र, त्याचे वस्तुमान धनक व विरक्तक या दोन्हींच्या संयुक्त वस्तुमानापेक्षा काहीसे कमीच असते. विजक सुटा होऊन उर्वरित वस्तुमानाचा धनभारित अणू निर्माण झाल्यास, म्हणूनच एक मूलक-जोडी निर्माण होत असते. इंग्रजीत आयॉन-पेअर.
[९] पृथ्वीबाहेरच्या अवकाशातून (विश्वातून) पृथ्वीवर येतात ते ’विश्वकिरण’. इंग्रजीत कॉस्मिक रेज.
[१०]पदार्थास धन किंवा ऋण करणार्‍या अण्वंतर्गत कणांस अनुक्रमे ’धनक’(प्रोटॉन) किंवा ’ऋणक’(इलेक्ट्रॉन) म्हणतात.

२०१२-०४-११

गीतानुवाद-००६: आगे भी जाने न तू

मूळ हिंदी गीतकार: साहीर, गांयिका: आशा, चित्रपट: वक्त
भूमिका: बलराज सहानी, साधना, सुनील दत्त, राजकुमार

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००४०५२६




आगे भी जाने तू

पुढे ही अनभिज्ञ तू

धृ
आगे भी जाने तू, पीछे भी जाने तू
जो भी है, बस यही एक पल है
यही वक्त है, कर ले पूरी आरजू
पुढे ही अनभिज्ञ तू, मागे ही अनभिज्ञ तू
जे जे आहे ते, पळ हाच आहे
साध हीच वेळ, करी पूरी इप्सिते

अन्जाने सायों का, राहो मे डेरा है
अन्देखी बाहोने, हम सब को घेरा है
ये पल उजाला है, बाकी अंधेरा है
ये पल गवाँना ना, ये पल ही तेरा है
जीनेवाले सोच ले,
यही वक्त है, कर ले पुरी आरजू
अनोळखी छायेचा, वाटेत डेरा आहे
अदृष्य हातांचा, आम्हाला घेरा आहे
पळ हा प्रकाशाचा, बाकी अंधेर आहे
पळ हा गमवू नको, तो पळ तुझा आहे
राहणार्‍या कर विचार,
साध हीच वेळ, करी पूरी इप्सिते

इस पल के जलवो ने, महफिल सवारी है
इस पल के गमीर् ने, धडकन उभारी है
इस पल के होने से, दुनिया हमारी है
ये पल जो देखो तो, सदियो पे वारी है जीनेवाले सोच ले,
यही वक्त है, कर ले पुरी आरजू
ह्या क्षणीच्या तोर्‍याने, बैठक सावरलेली
ह्या क्षणीच्या ऊर्जेने, धडधड चालवलेली
ह्याच्या अस्तित्वाने, दुनिया आमची आहे
शतके ओवाळून ह्या, पळा दिली आहेत
राहणार्‍या कर विचार,
साध हीच वेळ, करी पूरी इप्सिते

इस पल के साये मे, अपना ठीकाना है
इस पल के आगे की, हर शय फसाना है
कल किसने देखा है, कल किसने जाना है
इस पल से पायेगा, जो तुझको पाना है जीनेवाले सोच ले,
यही वक्त है, कर ले पुरी आरजू
ह्या क्षणीच्या छायेत, आपले ठिकाण आहे
या पुढल्या काळाचे, फसवे निशाण आहे
कोण पाही भविष्य, कोण जाणी भविष्य
ह्या क्षणानेच मिळेल, जे तुला मिळवायचे राहणार्‍या कर विचार,
साध हीच वेळ, करी पूरी इप्सिते