२०१२-११-२८

स्तोत्रानुवाद-०१: रावणविरचित शिवतांडव


मूळ संस्कृत श्लोक
मराठी अनुवाद
जटाटवीगलज्जल प्रवाहपावितस्थले
गलेऽवलम्ब्य लम्बितां भुजंगतुंगमालिकाम्‌
डमड्डमड्डमड्डम न्निनादवड्डमर्वयं
चकारचंडतांडवं तनोतु नः शिवः शिवम्‌
जटांमधून धावत्या जलांनि धूत-कंठ जो
धरीत सर्पमालिका, गळ्यात हार शोभतो
डुमूड्डुमू करीत या, निनाद गाजवा शिवा
करीत तांडव प्रचंड, शंकरा शुभं करा



जटा कटाहसंभ्रम भ्रमन्निलिंपनिर्झरी
विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि
धगद्धगद्धगज्ज्वल ल्ललाटपट्टपावके
किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम
जटांतुनी गतीस्थ, गुंतल्या झर्‍यांपरी अहा
तरंग ज्याचिया शिरी विराजती, शिवा पहा
ललाट ज्योतदाह ज्या शिवाचिया शिरी वसे
किशोर चंद्रशेखरा-प्रती रुचीहि वाढु दे



धराधरेंद्रनंदिनी विलास बंधुबंधुर-
स्फुरद्दिगंतसंतति प्रमोदमानमानसे
कृपाकटाक्षधोरणी निरुद्धदुर्धरापदि
क्वचिद्दिगम्बरे मनो विनोदमेतु वस्तुनि
नगाधिराज-कन्यका-कटाक्ष मोदिता शिवे
दिगंत संतती स्फुरून, मोदतीहि भक्त हे
कृपाकटाक्ष टाकिता जया, विपत्ति मावळे
कधी दिगंबरामुळे कळे न रंजना मिळे



जटाभुजंगपिंगल स्फुरत्फणामणिप्रभा-
कदंबकुंकुमद्रवप्रलिप्त दिग्वधूमुखे
मदांधसिंधुरस्फुरत्व गुत्तरीयमेदुरे
मनो विनोदद्भुतं बिभर्तु भूतभर्तरि
जटाभुजंग तद्मणी-प्रदीप्त कांति ह्या दिशा
कदंब-पुष्प-पीत-दीप्त, शोभती झळाळत्या
गजासुरोत्तरीय ज्या विभूषवी दिगंबरा
प्रती जडो मती, घडो मनोविनोद, तारका



सहस्रलोचनप्रभृत्य शेषलेखशेखर-
प्रसूनधूलिधोरणी विधूसरांघ्रिपीठभूः
भुजंगराजमालया निबद्धजाटजूटकः
श्रियै चिराय जायतां चकोरबंधुशेखरः
सहस्रलोचनादि देव, पादस्पर्शता सदा
तयांस भूषवित त्या, फुलांनि भूषती पदे
भुजंगराज हार हो, नि बांधतो जटाहि तो
प्रसन्न भालचंद्र तो, चिरायु संपदा करो



ललाटचत्वरज्वल द्धनंजयस्फुलिंगभा-
निपीतपंचसायकं नमन्निलिंपनायकम्‌
सुधामयुखलेखया विराजमानशेखरं
महाकपालिसंपदे शिरोजटालमस्तु नः
कपाल-नेत्र-पावका क्षणात मोकलूनिया
वधी अनंग, हारवी सुरेंद्र आदि देवता
शिरास भूषवीतसे सुधांशुचंद्र ज्याचिया
कपालिना, जटाधरा, दिगंत संपदा करा



करालभालपट्टिका धगद्धगद्धगज्ज्वल-
द्धनंजयाहुतीकृत प्रचंडपंचसायके
धराधरेंद्रनंदिनी कुचाग्रचित्रपत्रक-
प्रकल्पनैकशिल्पिनि त्रिलोचनेरतिर्मम
अनंग ध्वंसिला जिने, त्रिनेत्रज्योत तीच ती
नगाधिराज-नंदिनी-स्तनाग्र भाग वेधती
सुचित्र रेखते तिथे जयाचि दृष्टी योजुनी
त्रिलोचनाप्रती मना, जिवास वाढु दे रती



नवीनमेघमंडली निरुद्धदुर्धरस्फुर-
त्कुहुनिशीथिनीतमः प्रबंधबद्धकंधरः
निलिम्पनिर्झरिधरस्तनोतु कृत्ति सिंधुरः
कलानिधानबंधुरः श्रियं जगद्धुरंधरः
नव्या घनांनि दाटली, निशावसेपरी जशी
जटानिबद्धजान्हवीधरा प्रभा विभूषवी
गजेंद्र-चीर-शोभिता शशीकला प्रकाशवी
जगास धारका कृपा करून श्रीस वाढवी



प्रफुल्लनीलपंकज प्रपंचकालिमप्रभा-
वलंबिकंठकंधरारुचि प्रबंधकंधरम्‌
स्मरच्छिदं पुरच्छिंद भवच्छिदं मखच्छिदं
गजच्छिदांधकच्छिदं तमंतकच्छिदं भजे
प्रफुल्ल नील पंकजापरी प्रदीप्त कंठ ज्या
जये त्रिपूर ध्वंसिला, तसाच कामदेव वा
भवास तारणार आणि याग ध्वंसत्या हरा
भजेन शंकरास मी, गजांतका यमांतका



१०
अखर्वसर्वमंगला कलाकदम्बमंजरी-
रसप्रवाहमाधुरी विजृंभणामधुव्रतम्‌
स्मरांतकं पुरातकं भवांतकं मखांतकं
गजांतकांधकांतकं तमंतकांतकं भजे
कलाबहारमाधुरीस भृंग जो शिवा असे
अनंगहंत आणि जो त्रिपूर, याग ध्वंसतो
भवास तारका हरा, सदा शुभंकरा हरा
भजेन त्या शिवास मी, गजांतका यमांतका



११
जयत्वदभ्रविभ्रम भ्रमद्भुजंगमश्वस-
द्विनिर्गमत्क्रमस्फुर त्करालभालहव्यवाट्-
धिमिद्धिमिद्धिमि द्ध्वनन्मृदंगतुंगमंगल-
ध्वनिक्रमप्रवर्तित प्रचण्डताण्डवःशिवः
गतीस्थ सर्पहार जे, विषाग्नि सोडती असे
फणा उभा करून ते, कपालि ओतती विषे
मृदंगनाद गाजतो, ध्वनी मनास मोहतो
पवित्र तांडवी शिवा, विराजतो नि शोभतो



१२
दृषद्विचित्रतल्पयोर्भुजंग मौक्तिकस्रजो-
र्गरिष्ठरत्नलोष्टयोः सुहृद्विपक्षपक्षयोः
तृणारविंदचक्षुषोः प्रजामहीमहेन्द्रयोः
समप्रवृत्तीकः कदा सदाशिवं भजाम्यम्‌
शिळा नि शेज, मोतियांचि माळ, साप वा असो
जवाहिरे नि मृत्तिका, विपक्ष, मित्र वा असो
तृणे नि कोमलाक्षि, नागरिक वा नरेंद्र वा
करून भेद नाहिसे, कधी भजेन मी शिवा



१३
कदा निलिंपनिर्झरी निकुंजकोटरे वसन्‌
विमुक्तदुर्मतिः सदा शिरःस्थमंजलिं वहन्‌
विलोललोललोचनो ललामभाललग्नकः
शिवेति मंत्रमुच्चरन्‌ कदा सुखी भवाम्यहम्‌
कधी शिरी धरून हात, शंकरा स्तवेन मी
वसेन जान्हवीतिरी विमुक्त होउनी मती
सुनेत्रचंचलेचिया कपालिचा शिवाय’ ही
चिरायु सौख्य पावण्या, कधी सदा स्मरेन मी



१४
निलिम्प नाथनागरी कदम्ब मौलमल्लिका-
निगुम्फनिर्भक्षरन्मधूष्णिकामनोहरः
तनोतु नो मनोमुदं विनोदिनींमहर्निशम्‌ 
परिश्रय परं पदं तदंगजत्विषांचयः
पदी विनम्र देवतांशिरी कळ्या, कदंब जे
तये चितारली, मनोज्ञ रूप रेखली, पदे
विभूषति, सुशोभति, मनोहराकृतींमुळे
प्रसन्न ती करो अम्हा, सदाच सौरभामुळे



१५
प्रचण्ड वाडवानल प्रभाशुभप्रचारणी
महाष्टसिद्धिकामिनी जनावहूत जल्पना
विमुक्त वामलोचनो विवाहकालिकध्वनिः
शिवेति मन्त्रभूषगो जगज्जयाय जायताम्‌
विशाल सागरातल्या शुभेच्छु पावकापरी
महाष्टसिद्धिकामना करीत सर्व सुंदरी
विवाहकालि शंकरा व पार्वतीस चिंतिती
जगास जिंकता ठरो, ’शिवाय’ मंत्रता ध्वनी



१६
इमं हि नित्यमेव मुक्तमुक्तमोत्तमं स्तवं
पठन्स्मरन्‌ब्रुवन्नरो विशुद्धिमेति संततम्‌
हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं
विमोहनं हि देहिनां सुशंकरस्य चिंतनम्‌
सदा करून मोकळ्या स्वरात श्लोक पाठ हे
स्मरून वा श्रवून हे, विशुद्धता सदा मिळे
हरीप्रती, गुरूप्रती, रती, न वेगळी गती
अशा जिवास मोहत्या, शिवाप्रती सदा रुची



१७
पूजाऽवसानसमये दशवक्त्रगीतं
यः शम्भुपूजनपरं पठति प्रदोषे
तस्य स्थिरां रथगजेंद्रतुरंगयुक्तां
लक्ष्मीं सदैव सुमुखिं प्रददाति शम्भुः
पूजासमाप्तिस संध्येस म्हणेल जो हे
लंकेशगीत शिवस्तोत्र अनन्य-भावे
शंभू तया, रथ-गजेंद्र-तुरंग-स्थायी
लक्ष्मी प्रसन्न-वदना, वर-दान देई




॥ इति श्री. रावणकृतं
शिव-तांडव स्तोत्रं संपूर्णम्‌ ॥
अशाप्रकारेश्री. रावण विरचित
शिव-तांडव स्तोत्र संपूर्ण होत आहे.


संदर्भः

१.      शिवतांडवस्तोत्राचा हिंदीत अर्थ
http://hindi.webdunia.com/religion/occasion/vijayadashami/0710/19/107101...
२.     पंडित जसराज यांनी गायलेले
http://mp3ruler.com/mp3/shiv_tandav_stotram_pandit_jasraj.html
३.     रामदास कामत यांनी गायलेले
http://music.cooltoad.com/music/song.php?id=456184&PHPSESSID=1eb37958618...
४.     मूळ पंचचामर छंदातीलस्व. बजरंग लाल जोशी द्वारा रचित हिंदी अनुवाद
http://joshikavi.blogspot.in/2011/03/blog-post_1945.html
५.     अनुवाद रंजन http://anuvad-ranjan.blogspot.in/2012/11/blog-post.html#links 
६.      ॥ रावण विरचित शिव तांडव स्तोत्र ॥ - मराठी अनुवाद मायबोली डॉट कॉम http://www.maayboli.com/node/39386 
७.    शिव तांडव स्तोत्र - मराठी अनुवाद मिसळपाव डॉट कॉम  http://www.misalpav.com/node/23341 
८.      शिवतांडव स्तोत्राचा संगीतबद्ध मराठी अनुवाद http://www.maayboli.com/node/41491 
९.      शिवतांडव स्तोत्राचा अधोभारणक्षम संगीतबद्ध मराठी अनुवाद https://www.dropbox.com/s/eacdgyh19jye6pt/SHIVFINALrev3.MP3  


२०१२-०९-२०

१६ सप्टेंबर ह्या ओझोन दिनाच्या निमित्ताने

१९९५ सालापासून दरवर्षी १६ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (UN) पर्यावरण कार्यक्रम विभागातर्फे “आंतरराष्ट्रीय ओझोन दिन” साजरा केला जातो. ओझोन थराच्या संरक्षणासाठी १९८७ साली ह्या दिवशी कॅनडातील मॉन्ट्रिएल शहरात जगभरातील प्रतिनिधींनी एका आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या. हा करार होता ओझोनच्या थरास हानीकारक ठरणार्‍या पदार्थांचा वापर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचा. पृथ्वीला आणि पर्यायाने पृथ्वीवासीयांना घातक गोष्टींपासून वाचवणार्‍या ओझोन थराचे संरक्षण करण्याबाबत सजगता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटना प्रयत्नशील असते. पृथ्वीच्या पर्यावरणाला हानी पोहोचवण्यामध्ये मानवी घटक सहभागी असल्याची जाणीवही हा दिवस आपल्याला करून देतो.

ओझोन हा वातावरणामध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारा एक वायू आहे. ओझोनच्या एका रेणूमध्ये ऑक्सिजनचे तीन अणू असल्यामुळे ओझोनचे रासायनिक सूत्र O3 असे लिहितात. क्रिस्टियन फ़्रेडरिक स्कोएनबेन ह्या जर्मन-स्विस रसायनशास्त्रज्ञाने १८४० साली ओझोनचा शोध लावला. ग्रीक भाषेतील वास घेणे ह्या अर्थी असलेल्या “ओझेइन” ह्या शब्दापासून ओझोन हा शब्द तयार झाला आहे.

ओझोन हा वातावरणाच्या मुख्यत: दोन थरांमध्ये आढळतो. वातावरण म्हणजे प्रत्येकी १ किमी उंचीच्या १४० मजल्यांची इमारत आहे असे मानले, तर १६ मजल्यांपर्यंतचा (जमिनीपासून १० ते १६ किमीपर्यंतचा) वातावरणाचा थर म्हणजे तपांबर (troposphere).१७ ते ५०व्या मजल्यांपर्यंतचा (तपांबराच्या वर ५० किमी ) थर म्हणजे स्थितांबर. ओझोनच्या वातारवणातील एकूण प्रमाणाच्या १० टक्के ओझोन तपांबरात तर उरलेला ९० टक्के ओझोन स्थितांबरामध्ये (stratosphere) आढळतो. स्थितांबरातील ओझोनच्या ह्या मोठ्या प्रमाणामुळे ह्या थराला “ओझोनचा थर” असेही म्हणतात. ओझोनचे वातावरणातील प्रमाण सर्वत्र सारखे नसते. ओझोनचे प्रमाण विषुववृत्तीय प्रदेशावर कमी तर ध्रुवीय प्रदेशांवर सर्वाधिक असते.

जैविक पदार्थांच्या दहनातून, तसेच काही वायू आणि प्रदूषकांतील नैसर्गिकरीत्या घडणार्‍या रासायनिक अभिक्रियांमधून निर्माण होणारा ओझोन हा तपांबरातील (troposphere) ओझोनचा मुख्य स्रोत. तपांबरातील ओझोन हा प्रदूषक आहे. तपांबरामध्ये ओझोनचे प्रमाण वाढल्यास ते शेत्योत्पादनास तसेच जंगलांच्या वाढीस मारक ठरू शकते. फुफ्फुसांची क्षमता खालावणे, खोकला, घशाचे विकार वगैरेंसारख्या विविध श्वसनविकारांना आमंत्रण देते. ओझोनच्या विषारी गुणधर्मांमुळे हे श्वसनविकार मृत्यूसही कारणीभूत ठरू शकतात. ओझोन हा हरितगृह वायू (greenhouse gas) असल्यामुळे तो तपांबराचे व पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढविण्यासही कारणीभूत होऊ शकतो. त्यामुळे तपांबरातील ओझोन हा वाईट ओझोन असतो.

स्थितांबरातील (stratosphere) ओझोन हा नैसर्गिकरीत्या दोन टप्प्यांमध्ये तयार होतो. पहिल्या टप्प्यांत सौरप्रारणांमुळे ऑक्सिजनच्या रेणूंचे (O2)विघटन होऊन ऑक्सिजनचे अणू (O+O) वेगळे होतात. दुसर्‍या टप्प्यामध्ये विघटित ऑक्सिजन अणूंचा (O) ऑक्सिजनच्या रेणूंशी (O2) संयोग होऊन ओझोनचे रेणू (O3) तयार होतात. नैसर्गिकरीत्या निर्माण झालेल्या ओझोनचा सौरप्रारणांमुळे व मानवनिर्मित रसायनांशी संयोग पावल्याने नाश होतो.

सूर्यकिरणांतील अतिनील (ultraviolet or UV) प्रारणांमुळे ओझोनच्या रेणूंचे विघटन होते आणि अशाप्रकारे ओझोनचा थर अतिनील किरणांना पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्यापासून थोपवतो. अतिनील किरणे जमिनीपर्यंत पोहोचल्यास ती आपल्यासाठी हानीकारक असतात. त्यांच्यामुळे त्वचेची प्रतिकार शक्ती कमी होऊन त्वचेचा कर्करोग होणे,गुणसूत्रांचे (chromosomes) उत्परिवर्तन (mutation) होणे, पेशीच्या जिवंतपणाचे लक्षण असणार्‍या प्रथिने (protein) आणि केंद्रकाम्लासारख्या (nuclein acid) सूक्ष्म रेणूंना झळ पोहोचणे, अशासारखे दुष्परिणाम दिसून येतात. वनस्पती पेशींनाही त्यांमुळे झळ पोहोचते. पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊन शेत्योत्पादन घसरते. अन्नसाखळीच्या तळाशी असणार्‍या फायटोप्लॅंक्टन (जलीय वनस्पती) अतिनील प्रारणांमुळे नष्ट होऊ शकतात. स्थितांबरातील (stratosphere) ओझोन आपल्याला ह्या सर्व दुष्परिणामांपासून वाचवत असल्यामुळे हा चांगला ओझोन असतो.

मानवनिर्मित रसायनांमुळे अंटार्क्टिक स्थितांबरात (stratosphere) ओझोनचे प्रमाण खूप कमी होण्याला ओझोन छिद्र असे म्हणतात. ओझोनच्या थराला पडलेले छिद्र म्हणजे छ्त्रीचे कापड एखाद्या ठिकाणी झिजून छत्रीला भोक पडण्यासारखे आहे. ह्या ओझोन छिद्राची पहिली नोंद १९८५ साली जे.सी. फार्मन, बी.जी. गार्डिनर आणि जे.डी. शांकलिन ह्यांनी नेचर मासिकात लिहिलेल्या एका शोधनिबंधामध्ये केली. १९७० सालापासून ब्रिटिश अंटार्क्टिक सर्व्हेसाठी त्यांनी त्यांच्या हॅली बे (७६ अंश दक्षिण) येथील संशोधन केंद्रामधून ओझोन थरावर बारीक लक्ष ठेवले होते.

धरणाच्या भिंतीला छिद्र पडल्यास जसे त्यातून पाणी बाहेर उसळावे तसे ओझोन थर विरळ झाल्याने त्यातून अतिनील किरणे पृथ्वीच्या दिशेने उसळतात. अतिनील किरणांमुळे जीवसृष्टीवर होणारे घातक परिणाम आपण आधी पाहिलेच. ओझोन छिद्रामुळे होणार्‍या घातक परिणामांची झालेली पहिली जाणीव भीतीने अंगावर काटा यावा अशीच होती, कारण ते परिणाम थेट आपल्या अस्तित्वालाच आह्वान देणारे आहेत. शास्त्रज्ञांच्या फळीने ओझोनच्या थराला छिद्र पडण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत झाल्या असाव्यात हे शोधण्यासाठी कंबर कसली. त्यांच्या संशोधनांतून असे निष्पन्न झाले की ओझोन थराला छिद्र पाडणारे मुख्य गुन्हेगार आहेत ते ओझोननाशक पदार्थ (Ozone Depleting Substances, ODSs) ज्यांत प्रामुख्याने क्लोरोफ्लुरोकार्बने, अर्थात CFCs आणि इतर काही रसायनांचा समावेश होतो.

प्रचलित रसायनांना अविषारी व अज्वलनशील असा पर्याय शोधण्यातून जनरल मोटर्सच्या संशोधन केंद्रात १९३० साली क्लोरोफ्लुरोकार्बनांचा जन्म झाला. फ्रेय़ॉन (डु पॉन्ट, यू.एस.ए.) आणि आर्कटॉन (आयसीआय, यू.के.) ही सीएफसींची व्यापारी नावे आहेत. उत्पादन कमी खर्चिक असणे, साठवण्यास सोपे असणे, ज्वलनशील व स्फोटक नसणे, त्यांची इतर वायूंशी रासायनिक प्रक्रिया न होणे अशा फायदेशीर गुणधर्मांमुळे सीएफसी लोकप्रिय ठरले.सीफसी हे प्रामुख्याने स्प्रे कॅन्समध्ये प्रॉपेलण्ट म्हणून, मऊ फोममध्ये, फ्रिजमध्ये गारवा निर्माण करण्यासाठी म्हणून वापरले जातात. विशेषत: विकसनशील देशांत जसजसे सीएफसीच्या वापराचे प्रमाण वाढले तसतशी ओझोनच्या थराबद्दलची काळजी शास्त्रीय वर्तुळात वाढू लागली आणि शास्त्रज्ञांनी घातक परिणामांचे इशारे वेळोवेळी दिले.

ह्या ओझोननाशक पदार्थांमुळे (सीएफसी) ओझोनच्या थराला हानी कशी पोहोचते ते थोडक्यात पाहू. सीएफसी रेणूंचे हवेत उत्सर्जन (emission) झाले की वारे आणि वातावरणातील अभिसरणामुळे (Atmospheric Circulation) ते वातावरणातील खालच्या थरांत सर्वत्र मिसळतात. तापून वर जाणार्‍या हवेसोबत हे रेणू स्थितांबरात (stratosphere) पोहोचतात. सूर्यकिरणांतील अतिनील प्रारणांमुळे (Ultraviolet (UV) Radiation) त्यांचे अभिक्रियाशील (reactive) सीएफसींमध्ये रुपांतर होते आणि ते ओझोनच्या रेणूंचा नाश आरंभतात. आता प्रश्न असा पडतो की ओझोननाशक वायूंची निर्मिती अंटार्क्टिकावर होत नसूनही ओझोन छिद्र अंटार्क्टिकावर कसे? तर ह्याचे उत्तर दडले आहे ते वातावरणाच्या अभिसरणात आणि अंटार्क्टिकाच्या वैशिष्ट्यपूर्ण हवामानात.

तापमानातील फरकामुळे ध्रुवीय (Polar) प्रदेश आणि विषुववृत्तीय (Tropical) प्रदेशांदरम्यान वातावरणाचे अभिसरण होत असते. विषुववृतीय प्रदेशात तापून हलकी झालेली हवा वर जाऊन ती वातावरणाच्या वरच्या थरांत ध्रुवांच्या दिशेने जाते व धृवीय प्रदेशांत थंड होऊन खाली उतरून वातावरणाच्या खालच्या थरांमध्ये विषुववृत्ताच्या दिशेने वाहते. प्रक्रियाशील सीएफसी ह्या वातलहरींवर स्वार होऊन धृवांच्या दिशेने प्रवासाला निघतात.

ध्रुवीय प्रदेशात सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र असते. ध्रुवीय प्रदेशांमध्ये, विशेषत: अंटार्क्टिकातील हिवाळ्यात स्थितांबरातील (Stratosphere) तापमान खूपच कमी असते. तिथे बर्फकणांचे ढग तयार होतात ज्यांना ध्रुवीय स्थैतांबरिक ढग (Polar Stratospheric Clouds) असे म्हणतात. तिथवर पोहोचलेले सीएफसी ह्या ढगांमध्ये गोठतात. अंटार्क्टिकावर वसंत ऋतूचे आगमन झाले की सूर्याच्या उष्णतेने स्थैतांबरिक ढगांतील बर्फ वितळतो. त्यावेळी मुक्त झालेले अभिक्रियाशील सीएफसी तेथील ओझोनचा प्रचंड प्रमाणात नाश करतात. अशाप्रकारे अंटार्क्टिकावर ओझोन थराला छिद्र पडले आहे.

आर्क्टिक प्रदेशातही हिवाळ्यात कमी तापमान असले, तरी दर हिवाळ्यात ते ध्रुवीय स्थैतांबरिक ढग निर्माण होण्याएवढे खाली जातेच असे नाही. मात्र, गेल्या काही वर्षात अंटार्क्टिक प्रदेशाप्रमाणेच आर्क्टिक प्रदेशावरील ओझोनचा थरही विरळ होऊ लागल्याचे लक्षात आले आहे. हिवाळ्याच्या शेवटच्या महिन्यांमध्ये आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीला अंटार्क्टिक प्रदेशावर ओझोन छिद्र मोठे होते.

ओझोन छिद्रामुळे होणारे घातक परिणाम सुदैवाने आंतरराष्ट्रीय संघटनांच्या लक्षात येऊन त्यांनी ओझोन थराच्या संरक्षणार्थ योग्य ती पावले उचलली. त्याचाच परिणाम म्हणून १९८७ साली मॉंट्रियल करार झाला. क्लोरोफ्लुरोकार्बन, अर्थात सीएफसीच्या उत्पादनावर बंदी आणणे, त्यांना पर्यायी रसायने शोधणे वगैरे उपाय आधी विकसित देशांनी आणि कालांतराने विकसनशील देशांनी करून सीएफसींची निर्मिती आणि वापर पूर्णपणे थांबवावा अशी योजना ह्या कराराद्वारे आखली गेली. ह्या करारातील अटी १९८९ पासून लागू झाल्या. त्यानुसार सीफसीचा वापर कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांची पद्धतशीरपणे अंमलबजावणी विकसित आणि विकसनशील देशांत सुरू झाली. ह्या अटींची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास २०५० पर्यंत ओझोनचा थर पूर्ववत व्हावा असा अंदाज आहे. ह्या अटी जगभरातील अनेक देशांनी मान्य करून त्यांच्या पालनास सुरुवात केली असल्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकाराचे ते उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे माजी सचिव कोफी अन्नान ह्यांनी म्हटल्याप्रमाणे “हे आजवरच्या यशस्वी जागतिक सहकाराचे एकमेव उदाहरण असावे.” १९९१ साली ओझोन थराच्या संरक्षणासाठी भरलेल्या विएन्ना परिषदेमध्ये भारताने ह्या कार्यक्रमास पाठिंबा जाहीर करून १९९२ साली मॉंट्रिएल करारातील उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली.

ओझोनच्या थराला घातक असणार्‍या रसायनांचा वापर बंद करण्याच्या बाबतीत हा करार एक मैलाचा दगड ठरला आहे. उदाहरणार्थ, २०१० साल हे जगभरात सीफसींचे उत्पादन पूर्णपणे थांबवण्यासाठीचे शेवटचे वर्ष होते. आता सीफसींची जागा इतर रयायनांनी (उदाहरणार्थ हायड्रोक्लोरोफ्लुरोकार्बने (HCFC) व हायड्रोप्लुरोकार्बने (HFC) ) घेतली आहे. ही रसायनेही ओझोन थराला काही प्रमाणात घातक असली तरी ती सीफसींएवढी घातक नाहीत. ह्या नव्या रसायनांचा वापरही २०३० सालापर्यंत हळूहळू बंद होणे अपेक्षित आहे. हा वापर बंद करणे हे सर्व विकसित आणि विकसनशील देशांचे कर्तव्य आहे. सध्या जगाचे लक्ष वेधलेला हरितगृह वायूंच्या उत्सारणावर नियंत्रण आणणारा क्य़ोटो करार मॉंट्रिएल कराराप्रमाणे यशस्वी ठरेल अशी आशा करूया. तथास्तु!

-डॉ. निनाद शेवडे, अनुवाद : वरदा व. वैद्य डॉ. निनाद शेवडे सध्या ‘फाउंडेशन फॉर लिबरल ऍण्ड मॅनेजमेंट एज्युकेशन (FLAME)’ ह्या पुणे येथील संस्थेत वातावरणशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांनी हवामान व वातावरण शास्त्रात ब्रेमेन विद्यापीठ, जर्मनी येथून पीएचडी मिळवली आहे. डॉ.शेवडे यांचा मूळ इंग्रजी लेख.

हा लेख इथे प्रकाशित करण्यास अनुमती दिल्याखातर वरदा वैद्य यांस मनःपूर्वक धन्यवाद!
मुळात वातकुक्कुट ह्या त्यांच्या अनुदिनीवर प्रकाशित झालेला हा लेख उपक्रम डॉट कॉम वरही प्रकाशित झालेला आहे.

२०१२-०८-२८

प्रकाशतंतू



अक्र
Optical Fiber
प्रकाशतंतू



An optical fiber is a flexible, transparent fiber made of a pure glass (silica) not much wider than a human hair.
प्रकाशतंतू हा शुद्ध काचेचा (वालुका-स्फटिकाचा*) बनवलेला लवचिक, पारदर्शक, मनुष्याच्या केसाहून फारसा जाड नसलेल्या आकाराचा धागा असतो.

It functions as a waveguide, or light pipe, to transmit light between the two ends of the fiber.
तो लहर-मार्गदर्शक किंवा प्रकाश-नलिका म्हणून, धाग्याच्या दोन टोकांदरम्यान प्रकाश पारेषित करण्याचे कार्य करत असतो.

The field of applied science and engineering concerned with the design and application of optical fibers is known as fiber optics.
प्रकाशतंतूंच्या अभिकल्पन आणि उपायोजनाशी संबंधित उपायोजित विज्ञान आणि अभियांत्रिकी संबंधित क्षेत्रास प्रकाशतंतूशास्त्र म्हणून ओळखले जाते.

Optical fibers are widely used in fiber-optic communications, which permits transmission over longer distances and at higher bandwidths (data rates) than other forms of communication.
प्रकाशतंतूंचा उपयोग प्रकाशारोही संदेशवहनात विस्तृत प्रमाणात केला जातो, त्यांचेमुळे इतर संदेशवहन स्वरूपांचे मानाने दीर्घ पल्ल्याचे अंतर आणि अधिकतर कंप्रता-पल्ला-रुंदी (विदा दर) प्राप्त होऊ शकते.

Fibers are used instead of metal wires because signals travel along them with less loss and are also immune to electromagnetic interference.
धात्विक तारांऐवजी प्रकाशतंतूं वापरले जातात कारण त्यांचेवर संकेत थोडाच र्‍हास होऊन प्रवास करू शकतात आणि विद्युत्‌-चुंबकीय व्यवधानांपासून अबाधित राहतात.

Fibers are also used for illumination and are wrapped in bundles so they can be used to carry images, thus allowing viewing in tight spaces.
प्रकाशतंतू उजेडाकरताही वापरले जातात आणि मोळ्यांमध्ये बंदिस्त केले जातात जेणेकरून ते दृश्ये वाहून नेऊ शकतात आणि कमी जागेत त्यांचे दर्शन होऊ शकते.

Specially designed fibers are used for a variety of other applications, including sensors and fiber lasers.

LASER – Light Amplification by Simulated Emmission of Radiation.
विशेषकरून अभिकल्पित प्रकाशतंतू, विविध इतर उपायोजनांकरताही वापरले जातात, ज्यात संवेदन आणि लेझर यांचा समावेश होत असतो. 

लेझर
- उत्तेजित-प्रारण-उत्सर्जनाद्वारे केलेले प्रकाश-वर्धन.

*          म्हणजेच सिलिकॉन प्राणिलाचा ऊर्फ सिलिकाचा

२०१२-०७-३१

स्तोत्रानुवाद-०९: हर देश में तू, हर वेश में तू

हर देश में तू, हर वेश में तू 
तुकडोजी महाराज 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१२०७३१


हर देश में तू, हर वेश में तू
हर देशीही तू, हर वेशीही तू



॥१ ॥
हर देश में तू, हर वेश में तू
तेरे नाम अनेक, तू एक ही है
तेरी रंगभूमी, यह विश्व धरा
सब खेल में, मेल में, तू ही तू है
हर देशीही तू, हर वेशीही तू
रूपात हरेक, असशी परी तू
तुझी रंगभूमी, ही सृष्टी जरी
खेळांतही तू, मेळांतही तू

॥२॥
सागर से उठा, बादल बनकर
बादल से गिरा, जल हो कर के
फिर नहर बना, नदिया गहरि
तेरे भिन्न प्रकार, तू एक ही है
सागरी उठशी, मेघांतूनी तू
पर्जन्य झरशी, जल होऊन तू
मग झर, निर्झर, नदी होशी
प्रकार अनेक, जलाशय तू

॥३॥
मिट्ठी से ही अणु, परमाणु बना
इस जीव जगत का, रूप लिया
कहीं पर्वत, वृक्ष विशाल बना
सौन्दर्य तेरा, तू एक ही है
घडला मातीतुनी, अणुरेणू
रूप जीवसृष्टीचे, शाश्वत तू
पर्वत कधी, विशाल तरूही तू
कौतूक तुझे, सत्‌ एकची तू

॥४॥
यह दिव्य दिखाया, है जिसने
यह है गुरूदेवकी, पूर्ण दया
तुकड्या कहे, कोई न और दुजा
बस मैं और तू, सब एक ही है
दाविशी दिव्य, जरी हे तू
गुरूदेव दयाघन, प्रसन्न तू
तुकड्या सांगे, परका न कुणी
एकच सगळे जण, मी आणि तू

२०१२-०५-२७

गीतानुवाद-०१२: तुम अगर साथ देने का


मूळ हिंदी गीतकार: साहिर, संगीत: रवी, गायक: महेंद्र कपूर
चित्रपट: हमराज, साल:१९६७, भूमिका: सुनील दत्त, मुमताज, विम्मी, राजकुमार

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०३२६


तुम अगर साथ देने का 
साथ देण्याचे जर का



धृ
तुम अगर साथ देने का वादा करो
मैं यूँही मस्त नग़मे लुटाता रहूं
तुम मुझे देखकर मुस्कुराती रहो
मैं तुम्हें देखकर गीत गाता रहूँ
साथ देण्याचे जर का तू करशील कबूल
मी असाच धुंद गीतांचे गुंजन करीन
तू मला पाहुनी स्मित, करतच राहा
मी तुला पाहुनी गीत, गातच राहीन

कितने जलवे फ़िज़ाओं में बिखरे मगर
मैने अबतक किसीको पुकरा नहीं
तुमको देखा तो नज़रें ये कहने लगीं
हमको चेहरे से हटना गवारा नहीं
तुम अगर मेरी नज़रों के आगे रहो
मैं हर एक शय से नज़रें चुराता रहूँ
रूपसौंदर्य उपवनी विखुरले जरी
आजवर साद कोणाही मी ना दिली
पाहिले ग तुला मग हे नयन बोलले
रूप सोडून तुझे दूर होऊच नये
दृष्टीपुढतीच जरी तू राहशील तरी
हरक्षणी नजरानजरीस 'खो' मी देईन

मैने ख़्वाबों में बरसों तराशा जिसे
तुम वही संग--मरमर की तस्वीर हो
तुम समझो तुम्हारा मुक़द्दर हूँ मैं
मैं समझता हूं तुम मेरी तक़दीर हो
तुम अगर मुझको अपना समझने लगो
मैं बहारों की महफ़िल सजाता रहूं
स्वप्नी, वर्षानुवर्षे मी जशी तासली
तू तशीच मूर्ती संगमरवरी आहेस
तू मला मान ना भवितव्यच तुझे
मी तुला मात्र भाग्यच माझे म्हणेन
आणि तू जर समजशील आपला मला
मी बहारीच्या मैफलीस रंगत आणीन

मैं अकेला बहुत देर चलता रहा
अब सफ़र ज़िन्दगानी का कटता नहीं
जब तलक कोई रंगीं सहारा ना हो
वक़्त क़ाफ़िर जवानी का कटता नहीं
तुम अगर हमक़दम बनके चलती रहो
मैं ज़मीं पर सितारे बिछाता रहूं
एकटा मी कधीचाच चालत आहे
हा पथ जीवनाचा पण सरतच नाही
जोवरी संग रंगीत ना सोबत असे
काळ हा यौवनाचा सरतच नाही
सोबतीने माझ्या जर तू चलशील तर
मी भुईवरती तारे पसरत चलेन